तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी ही बॉलिवूडची अभिनेत्री झालीय सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 20:09 IST2019-06-14T20:08:55+5:302019-06-14T20:09:48+5:30

बॉलिवूडची ही अभिनेत्री सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झालीय.

Bollywood actress Janhvi Kapoor is ready to catch your attention!, she started shooting of RoohiAfza | तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी ही बॉलिवूडची अभिनेत्री झालीय सज्ज!

तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी ही बॉलिवूडची अभिनेत्री झालीय सज्ज!

श्रीदेवी-बोनी कपूरची लाडकी लेक आणि ‘धडक’ फेम जान्हवी कपूर लवकरच ‘रूहअफ्जा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी राजकुमार राव आणि वरूण शर्मासोबत झळकणार आहे. दिशेन विजान निर्मित या हॉरर-कॉमेडी चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे.

‘स्त्री’च्या या अनपेक्षित यशानंतर निर्माता दिनेश विजन व अभिनेता राजकुमार राव पुन्हा एकदा ‘रूहअफ्जा’ हा नवा कोरा हॉरर कॉमेडी चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटात जान्हवी डबल रोलमध्ये दिसणार आहे. रूही आणि अफ्जा असे दोन रोल ती साकारताना दिसेल.या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरूवात झाली. ही माहिती खुद्द जान्हवीने सोशल मीडियावर दिली आहे. तिने मुहूर्ताच्या क्लॅपचा फोटो शेअर करीत म्हटलं की, तुमच्या अटेंशनवर ताबा घेण्यासाठी येतोय, आजपासून सुरू होते ‘रूहअफ्जा’. 

‘रूहअफ्जा’ या चित्रपटाशिवाय जान्हवी गुंजन सक्सेनाचा बायोपिक आणि ‘तख्त’ चित्रपटात दिसणार आहे. गुंजन सक्सेनाच्या बायोपिकचे शूटींग ती करत होती. तर ‘तख्त’ अद्यापही प्री-प्रॉडक्शन टप्प्यात आहे.

‘तख्त’ हा चित्रपट पुढील वर्षांत फ्लोरवर येईल, असे मानले जात आहे. त्यापूर्वी जान्हवी ‘रूहअफ्जा’ पूर्ण करणार आहे. ‘रूहअफ्जा’चे शूटींग सुरु झाले असून २० मार्च २०२० रोजी हा चित्रपट रिलीज होईल.

राजकुमारसोबत जान्हवीचा हा पहिला चित्रपट असेल. साहजिकच या नव्या-कोऱ्या जोडीच्या ‘रूहअफ्जा’चा स्वाद चाखण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

तसेच या चित्रपटात जान्हवीला डबल रोलमध्ये पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Bollywood actress Janhvi Kapoor is ready to catch your attention!, she started shooting of RoohiAfza