दिव्या दत्तासोबत इंटिमेट सीन देताना अशी झाली होती इरफान खानची अवस्था, अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:59 IST2025-05-28T16:56:37+5:302025-05-28T16:59:04+5:30

पडद्यावर दिसणारे कलाकार, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा प्रोफेशनल आयुष्यात घडलेले प्रसंग याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात.

bollywood actress divya dutta recalls irrfan khan was more nervous while filming kissing scene in hisss movie  | दिव्या दत्तासोबत इंटिमेट सीन देताना अशी झाली होती इरफान खानची अवस्था, अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा

दिव्या दत्तासोबत इंटिमेट सीन देताना अशी झाली होती इरफान खानची अवस्था, अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा

Divya Dutta: पडद्यावर दिसणारे कलाकार, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा प्रोफेशनल आयुष्यात घडलेले प्रसंग याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात. त्याचबरोबर बऱ्याचदा कलाकार अगदी बेधडकपणे त्यांचे अनुभव चाहत्यांसोबत शेअर करतात. असाच एक किस्सा अभिनेत्री दिव्या दत्ताने सांगितला आहे. आपल्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या दिव्या दत्ताच्या (Divya Dutta) अभिनयाचं प्रचंड कौतुक होतं. त्यात नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिव्याने अभिनेता इरफान खानसोबतच्या काम करण्याच्या अनुभवावर भाष्य केलं आहे.

अभिनेत्री दिव्या दत्ता आणि इरफान खान हिस्स हा सिनेमा २०१० मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दिव्या आणि इरफान खानच्या इंटिमेट सीन्सची देखील प्रचंड चर्चा झाली. परंतु त्याच सीनदरम्यान,अभिनेता इरफान खान चक्क घाबरला होता. असा किस्सा तिने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीमध्ये शेअर केला आहे. त्याबद्दल सांगताना दिव्या म्हणाली, जेनिफल लिंच (दिग्दर्शिका) यांनी आम्हाला तो सीन उत्तमरित्या समजावून सांगितला होता. तो फारच सुंदर सीन होता. त्यावेळी मी त्यांना विचारलं की इरफान कुठे आहे. त्या म्हणाल्या की तो टेरेसवर आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त नर्व्हस आहे. त्यानंतर मी टेरेसवर गेले आणि इरफानला म्हटलं, चल आपण तो सीन करुया  

पुढे अभिनेत्रीने सांगितलं, त्यावेळी जेनिफर (दिग्दर्शिका) आम्हाला सांगत होती की तुम्ही एक कपल आहात, तुम्हाला एक मुल हवं आहे आणि त्यासाठी हा सीन करताय, असं तिने स्पष्टपणे सांगितलं आणि मग मनातील भीती देखील दूर झाली. तेव्हा तो सीन उत्तम व्हावा यासाठी संपू्र्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली होती. असा किस्सा अभिनेत्रीने सांगितला.

दिव्या दत्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच ती 'छावा' या चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटात तिने केलेल्या कामाची सगळ्यांनीच स्तुती केली. तसंच 'भाग मिल्खा भाग', 'बदलापूर', 'ब्लॅकमेल' अशा सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. दिव्या अनेकदा वेबसीरिज आणि बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसते. आशयघन आणि संवेदनशील भूमिका करण्यात दिव्याचा हातखंडा आहे.

Web Title: bollywood actress divya dutta recalls irrfan khan was more nervous while filming kissing scene in hisss movie 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.