लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली अन् फसली, लग्नाच्या ३ महिन्यांतच नवऱ्यापासून झाली विभक्त, अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:49 IST2025-11-09T14:43:22+5:302025-11-09T14:49:46+5:30
३ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली अन् लग्नानंतर घटस्फोट; 'त्या' निर्णयाचा अभिनेत्रीला झाला पश्चाताप, म्हणाली-" मला एकटेपणा..."

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिली अन् फसली, लग्नाच्या ३ महिन्यांतच नवऱ्यापासून झाली विभक्त, अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय घडलं?
Pooja Ruparel: शाहरुख खान आणि काजोलची प्रमुख भूमिका असलेला दिलवाले दु्ल्हनिया ले जाएंगे हा १९९५ साली आलेला चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटाप्रमाणे त्यातील प्रत्येक पात्राची चर्चा झाली. दरम्यान, या चित्रपटात काजोलच्या छोट्या बहीणीची म्हणजेच चुटकीची भूमिका साकारून अभिनेत्री पूजा रुपारेल चाहत्यांची मनं जिंकली.या चित्रपटानंतर पूजा इंडस्ट्रीत फारशी सक्रिय दिसली. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे च्या यशानंतर पूजाने टीव्ही इंडस्ट्रीकडे वळली. पण, तिथेही तिला फारसं यश मिळालं नाही. सध्या ही अभिनेत्री एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने वैयक्तिक आयुष्यासह अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
नुकतीच पूजाने सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या रिलेशनशिपबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला.यावेळी ती म्हणाली,ती एका व्यक्तीसोबत ३ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिली आणि काही वर्षातच त्याच्यासोबत लग्नबंधनात अडकली होती.मात्र,लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांचं नातं तुटलं असं सांगितलं. त्यादरम्यान मुलाखतीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी तिच्या पार्टनरचं काय म्हणणं होतं , यावर उत्तर देताना पूजा म्हणाली, तो याबद्दल बोलायला कायम टाळत असे. मी जर कोणत्या विषयावर त्याच्याशी बोलायला गेले की तो म्हणायचा,आपण यावर सोमवारी बोलूयात का.तो माझं म्हणणं समजूनच घेत नव्हता. "
त्यानंतर पुजाने म्हटलं, "त्यावेळी पहिल्यांदा मला असं वाटलं की आम्ही एकत्र येऊन चूक तर केली नाही ना. मी प्रत्येक गोष्टीचा भावनिकदृष्ट्या विचार करायचे पण तो तसा नव्हता. त्यामुळे मला एकटेपणा जाणवायचा.मग मी यावर खूप विचारपूर्वक निर्णय घेतला आणि म्हणाले आता खूप झालं. त्यानंतर मी परदेशातून परत आले आणि त्याला घटस्फोटाबद्दल स्पष्ट सांगितलं. " असा खुलासा अभिनेत्रीने यादरम्यान केला. मात्र,यावेळी पुन्हा लग्न करण्याच्या निर्णयावर अभिनेत्रीने मौन बाळगणं पसंत केलं.