भावाच्या एका भेटीसाठी अभिनेत्री व्याकूळ! १४ महिन्यांपासून युएईमध्ये कैदेत; पोस्ट वाचून डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 12:29 IST2025-11-10T12:25:59+5:302025-11-10T12:29:47+5:30
१४ महिन्यांपासून युएईच्या जेलमध्ये आहे अभिनेत्रीचा भाऊ! सूटकेसाठी करतेय आतोनात प्रयत्न, भावुक होत म्हणाली...

भावाच्या एका भेटीसाठी अभिनेत्री व्याकूळ! १४ महिन्यांपासून युएईमध्ये कैदेत; पोस्ट वाचून डोळे पाणावतील
Celina Jaitly Post: माजी मिस इंडिया आणि बॉलीवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने हिचा भाऊ विक्रांत कुमार जेटली, गेल्या वर्षभरापासून UAE मध्ये पोलिसांच्या ताब्यात असल्याचं समोर आलं आहे. विक्रांत कुमार जेटली साधारण २०२४ पासून संयुक्त अरब अमीरातमध्ये सरकारच्या ताब्यात आहे. त्यामुळे आपल्या भावाच्या सुटकेसाठी अभिनेत्री गेले अनेक दिवस झगडते आहे. इतकंच नाहीतर भाऊ विक्रांतसाठी तिने कोर्टाचाही दरवाजा ठोठावला. मात्र, भावाच्या आठवणी तिला स्वस्थ बसू देत नाहीत. नुकतीच अभिनेत्रीने तिच्या भावासाठी भावुक करणारी पोस्ट लिहिली आहे, ज्यामुळे चाहत्यांचेही डोळे पाणावलेत.
सेलिना जेटली भावाच्या भेटीसाठी व्याकूळ झाली आहे. त्यात आता आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर तिने पोस्ट शेअर करत मनातील भावनांना मोकळीक करुन दिली आहे. या पोस्टसह अभिनेत्रीने भाऊ विक्रांत जेटीलाचा फोटो शेअर करत त्यामध्ये म्हटलंय, "#mybrotherandme, माझा डम्पी, मला आशा आहे की तू ठीक असशील. आणि तुला हेही माहिती असेल की मी तुमच्या पाठीशी कणखरपणे उभी आहे. शिवाय तुझ्या आठवणीत एकही रात्र अशी गेली नाही, जेव्हा मी रडले नसेन. "
मी तुझी वाट पाहतेय...
यानंतर पुढे सेलिनाने म्हटलंय, "तुला माहितीये मी तुझ्यासाठी सर्व काही सोडेन आणि आपल्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. मला आशा आहे की तुला हे माहित असेल की मी कोणतीही कसर सोडली नाही. देव शेवटी तुझ्यावर आणि माझ्यावर दया करेल, माझा भाऊ.. मी तुझी वाट पाहत आहे...". अशी भावनिक पोस्ट सेलिनाने शेअर केली आहे.
दरम्यान,सेलिना जेटलीने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत तिला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिलंय, "तुम्ही अखेर करुन दाखवलं". तर आणखी एका यूजरने लिहिलंय, "मला आशा आहे की या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल आणि तुमचा भाऊ लवकरात लवकरच घरी परत येईल... देव तुमचं भलं करो", अशी कमेंट करत या चाहत्याने पोस्टवर केली आहे.
विक्रांत कुमार जेटली हे २०२४ पासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये कैदेत आहेत. त्यांच्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत पुरवावी, अशी मागणी सेलिनानं केली आहे.सोमवारी या प्रकरणाची सुनावणी झाली, जिथे न्यायालयाने परराष्ट्र मंत्रालयाला तिच्या भावाला परत आणण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.