"माझ्यावर काळी जादू...", अमृता रावचा हादरवणारा खुलासा, सांगितला 'तो' विचित्र अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:18 IST2025-10-14T12:05:23+5:302025-10-14T12:18:44+5:30
तीन चित्रपट हातून गेले, मानधन परत केलं अन्; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीकडून जादुटोणा केल्याचा धक्कादायक दावा

"माझ्यावर काळी जादू...", अमृता रावचा हादरवणारा खुलासा, सांगितला 'तो' विचित्र अनुभव
Bollywood Actress: बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून अमृता रावची ओळख आहे.'विवाह', 'इश्क विश्क' यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली. अमृताने 'अब के बरस' या चित्रपटातून तिने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. मात्र, २०१६ मध्ये तिने आरजे अनमोलसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती सिनेविश्वापासून थोडी दुरावली.अलिकडेच अमृता जॉली एलएल बी-३ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. याचदरम्यान, अमृता वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसते आहे. अशातच एका मुलाखतीत अभिनेत्रीने धक्कादायक दावा केला आहे.
अलिकडेच रणबीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये अमृताने हजेरी लावली. त्यावेळी अमृताने तिच्यावर कोणीतरी जादुटोणा केल्याचा धक्कादायक दावा केला. यामुळे तीन मोठे चित्रपट गमावले आणि तिला तिची साइनिंग रक्कमही परत करावी लागली होती, असा खुलासा तिने केला.त्यादरम्यान, तिने सांगितलं की,"एक वेळ होती जेव्हा ती आपल्या गुरुंना भेटली होती. त्यांनी आशार्वाद दिला. त्यानंतर त्यांनी एक-दोन दिवसांनी माझ्या आईशी बोलून तुमच्या मुलीवर काळी जादू केल्याचे सांगितलं. मी या गोष्टींवर कधीच विश्वास नव्हता,मात्र गुरुंनी सांगितल्याने मला ते पटलं."
त्यानंतर पुढे ती म्हणाली, "मला माहित आहे की तिचे पूर्णपणे खरे आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीचा लोभ नाही, काहीही गमावण्याची भीती नाही. त्यांनी मला फक्त सत्य सांगितलं होतं.पण, त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मला जाणवलं की कदाचित माझ्यावर काळी जादू झाली असेल. आतापर्यंत मी इतर नायिकांकडून फक्त ऐकलं होते की इंडस्ट्रीमध्ये काळी जादू अस्तित्वात आहे." त्यानंतर अमृता असंही म्हणाली की तिला कोणताही काळा जादूचा अनुभव आला नाही,परंतु तिच्यासोबत काही नकारात्मक गोष्टी घडल्या होत्या. "
पुढे आयुष्यातील त्या कठीण काळावर भाष्य करत अभिनेत्री म्हणाली, "माझ्या आयुष्यात काही वेगळ्याच गोष्टी घडल्या.जेव्हा मी तीन मोठे चित्रपट साइन केले, ते सर्व सिनेमे मोठ्या प्रोडक्शनचे होते. त्या वर्षी घडलेली सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे तिन्ही चित्रपट कधीच बनू शकले नाहीत. मी साइनिंगची रक्कम देखील घेतली, पण ते प्रकल्प रखडले. माझ्यासाठी तो अनुभव थोडा विचित्र होता. असा खुलासा अभिनेत्रीने केला.