"त्याच्यासोबत वन नाईट स्टँड करेन...", हॉलिवूडच्या हँडसम हंकवर जडलाय 'या' अभिनेत्रीचा जीव, स्वत:च दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 10:29 IST2025-09-26T10:24:41+5:302025-09-26T10:29:13+5:30
६३ वर्षीय अभिनेत्यासाठी वेडी झालीये ही बॉलिवूडची सुंदरी, म्हणाली-" त्याच्यासाठी सगळी तत्वे..."

"त्याच्यासोबत वन नाईट स्टँड करेन...", हॉलिवूडच्या हँडसम हंकवर जडलाय 'या' अभिनेत्रीचा जीव, स्वत:च दिली कबुली
Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने कहो ना प्यार है या चित्रपटातून इंडस्ट्रीत डेब्यू करत रातोरात स्टार झाली. या सुपरहिट चित्रपटाने तिला चांगलीच प्रसिध्दी मिळवून दिली होती. आजवर अमिषाने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.वयाची पन्नाशी उलटून गेली तरी अमिषा अद्यापही अविवाहित आहे. अशातच सध्या अमिषाने एका मुलाखतीत वन नाईट स्टॅंड करण्याची इच्छा असल्याचं वक्तव्य केलं आहे. तिच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
नुकतीच अमिषा पटेलने रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. इंडस्ट्रीत अमिषाचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं मात्र तिने कायम मौन बाळगलं. दरम्यान, या मुलाखतीत अभिनेत्री तिला आवडणाऱ्या अभिनेत्याविषयी भरभरुन बोलली. अमिषाला हॉलिवूड अभिनेता ट्रॉम क्रुझ प्रचंड आवडतो अशी कबुली तिने या पॉडकास्टमध्ये दिली. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, "मला टॉम क्रूझ खूप आवडतो. जर तू त्याच्याबरोबर कधी पॉडकास्ट केलास तर मला नक्की बोलव. मला अगदी लहानपणापासूनच टॉम क्रुझ आवडतो. माझ्या शाळेच्या पेन्सिल बॉक्समध्ये त्याचा फोटो असायचा. माझ्या खोलीतही टॉम क्रूझची पोस्टर्स होती.
वन नाईट स्टॅण्ड करु शकते...
त्यानंतर पुढे अभिनेत्री म्हणाली, "टॉम कूझ मला नेहमीच माझा क्रश राहिला आहे. मी नेहमीच गमतीत म्हणत असते की तो माझ्या आयुष्यातील एकमेव माणूस आहे ज्याच्यासाठी मी माझी तत्वं बाजूला ठेवू शकते.त्याच्यासाठी मी काहीही करु शकते. जर मला विचारलं की मी त्याच्यासोबत वन नाईट स्टॅण्ड करु शकते का तर हो मी करु शकते. "असं वक्तव्य अमिषाने या मुलाखतीत केलं.