५ वर्ष डेटिंग अन् मग थाटला संसार! 'या' कारणामुळे आलिया भटने रणबीरला लग्नासाठी दिलेला होकार,म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:47 IST2025-10-03T11:45:18+5:302025-10-03T11:47:43+5:30
"आम्ही दोघंही…", आलिया भटने सांगितलं रणबीरबरोबर लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली...

५ वर्ष डेटिंग अन् मग थाटला संसार! 'या' कारणामुळे आलिया भटने रणबीरला लग्नासाठी दिलेला होकार,म्हणाली...
Alia Bhatt: चित्रपटांमध्ये अभिनय करण्याव्यतिरिक्त काही कलाकार हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील सर्वाधिक चर्चेत असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे आलिया भट आणि रणबीर कपूर.बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत आणि लोकप्रिय असणारी ही जोडी आहे. ५ वर्ष डेटिंग केल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना राहा नावाची गोडी मुलगी देखील आहे. सध्या हे जोडपं त्यांच्या सुखी संसारात व्यस्त आहेत. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने त्यांच्या वैवाहिक आयु्ष्यावर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर तिने रणबीरबरोबर लग्न करण्यामागचं कारणही सांगितलं आहे.
आलिया भटने अलिकडेच काजोल आणि ट्विंकल खन्ना यांच्या ‘टू मच विद काजोल एंड ट्विंकल’ या नव्याकोऱ्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात अभिनेता वरुण धवन देखील तिच्यासोबत उपस्थित होता. याचदरम्यान, अभिनेत्रीने रणबीर कपूर आणि तिच्या वैवाहिक आयुष्यावर प्रतिक्रिया दिली. या मुलाखतीमध्ये आलिया रणबीर आणि तिच्या नात्याबद्दल म्हणाली, "रणबीर आणि माझ्यामध्ये आजही चांगली मैत्री आहे. लग्नाआधी आमच्यामध्ये मैत्रीचं नातं होतं. पण, खरंतर मी त्याच्याबरोबर एका कारणामुळे लग्न केलं, ते म्हणजे तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. मी आजही सर्वात जास्त कोणाला ट्रोल करत असेन तर तो रणबीर आहे. आम्ही दोघंही एकमेकांना सतत ट्रोल करत असतो."
त्यानंतर पुढे आलियाने म्हटलं की, "नात्यामध्ये एकमेकांचा आदर करणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मग एकमेकांना पाठिंबा देणं किंवा प्रेम करणं असो. माझ्यासाठी लग्नानंतर नात्याचा आदर करणं महत्त्वाचं आहे." त्याचबरोबर आलियाने त्यांचं लग्न अगदी मोजक्या मंडळींच्या उपस्थित करण्यामागचं कारणंही सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, "आम्हाला दोघांनाही कायम आपल्या माणसांसोबत राहणं आवडतं. त्यामुळे आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगी आपलीच माणसं आजुबाजूला हवी असं आम्हाला वाटत होतं. त्यामुळे आम्ही आमचं लग्न खाजगी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला."
दरम्यान, आलिया भटच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलिकडेच ती 'जिगरा' या चित्रपटात पाहायला मिळाली होती. लवकरच ती यशराज फिल्म्सच्या अल्फा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटात संजय दत्त आणि शर्वरी वाघ देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर रणबीर कपूर सध्या 'रामायण' या बिग बजेट प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.