रश्मिका आणि काजोलनंतर आता आलिया भट झाली डीपफेकची शिकार, अश्लील व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 11:14 IST2023-11-27T10:39:20+5:302023-11-27T11:14:48+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट डीपफेकची शिकार झाली आहे. आलियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

bollywood actress alia bhatt deepfake video viral after rashmika mandanna and kajol | रश्मिका आणि काजोलनंतर आता आलिया भट झाली डीपफेकची शिकार, अश्लील व्हिडिओ होतोय व्हायरल

रश्मिका आणि काजोलनंतर आता आलिया भट झाली डीपफेकची शिकार, अश्लील व्हिडिओ होतोय व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ समोर आल्यानंतर काजोलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये एका इन्फ्लुएन्सरच्या जागी काजोलचा चेहरा एडिट करण्यात आला होता. आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट डीपफेकची शिकार झाली आहे. आलियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

या व्हिडिओत एक मुलगी बेडरुममध्ये विचित्र हावभाव करताना दिसत आहे. व्हिडिओतील या मुलीच्या जागी आलियाचा चेहरा एडिट करण्यात आला आहे. हा अश्लील व्हिडिओ डीपफेक असल्याचं समोर आलं आहे. पण, गेले काही दिवस सातत्याने अभिनेत्रींचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्याने चिंता वाढली आहे. 

रश्मिका मंदानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने टेक्नोलॉजीचा दुरुपयोग करण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. "मला हे शेअर करताना अत्यंत दु:ख होत आहे. पण, ऑनलाईन व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडिओबाबत भाष्य करणं गरजेचं आहे. असा व्हिडिओ केवळ माझ्यासाठीच नाहीतर प्रत्येकासाठी भीतीदायक आहे. टेक्नोलॉजीच्या चुकीच्या वापरामुळे आपलं खूप नुकसान होत आहे.आज एक महिला आणि अभिनेत्री म्हणून मला पाठिंबा दिलेले कुटुंबीय, चाहते आणि मित्रपरिवाराची मी आभारी आहे. पण, जर मी शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना हे माझ्याबरोबर घडलं असतं. तर याकडे मी कसं पाहिलं असतं याचा मी विचारही करू शकत नाही. अनेकांच्या बाबतीत हे घडण्याआधी एक समाज म्हणून याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे," असं ती म्हणाली होती. 

रश्मिकानंतर काजोलचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा फोटोही एडिट करून व्हायरल करण्यात आला होता.एवढंच काय तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा शुबमन गिलबरोबरचा फोटो व्हायरल झाला होता. साराने भाऊ अर्जुन तेंडुलकरबरोबरचा फोटो शेअर केला होता. त्यामध्ये अर्जुनचा चेहरा एडिट करून शुबमनचा चेहरा लावण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर साराने पोस्ट शेअर करत फोटो फेक असल्याचं सांगतिलं होतं. 

Web Title: bollywood actress alia bhatt deepfake video viral after rashmika mandanna and kajol