कार्तिक आर्यनच्या एक्झिटनंतर 'दोस्ताना २' मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी? मोठी अपडेट समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:54 IST2025-05-07T11:50:42+5:302025-05-07T11:54:33+5:30
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला 'दोस्ताना २' हा चित्रपट मागील काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे.

कार्तिक आर्यनच्या एक्झिटनंतर 'दोस्ताना २' मध्ये 'या' बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी? मोठी अपडेट समोर
Dostana 2 Update: करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला 'दोस्ताना २' हा चित्रपट मागील काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. २०१९ मध्ये 'दोस्ताना-२' ची घोषणा केल्यानंतर या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता होती. करण जोहर निर्मित 'दोस्ताना २' मध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि लक्ष्य लालवानी यांच्यासोबत जान्हवी कपूरची निवड करण्यात आली होती. मात्र, २०२१ मध्ये, अफवा पसरल्या की कार्तिक आणि करणमध्ये मतभेद आहेत, ज्यानंतर त्यांना चित्रपटातून बाहेर पडावे लागले आणि त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले. या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा या चित्रपटाविषयी चर्चा सुरु झाली आहे. आता 'दोस्ताना-२' च्या कास्टिंगमध्ये बदल करण्यात आल्याचं समजतंय.
एकीकडे कार्तिक आर्यन हा करण जोहरच्या 'नागजिला' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. त्यात आता लक्ष्य लालवानी हा दोस्ताना-२ या प्रोजेक्टचा भाग असणार असल्याचं म्हटलं जात आहे. सुरुवातीला चित्रपटाची घोषणा केल्यानंतर अभिनेता कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर आणि लक्ष्य लालवानी हे कलाकारांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला होता. त्यात आता या चित्रपटासाठी एका अभिनेत्याचं नाव समोर येत आहेत. लवकरच 'दोस्ताना २' च्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार असल्याचं सांगितलं जातंय.
मीडिया रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनने या प्रोजेक्टमधून एक्झिट घेतल्यानंतर आता त्याच्या जागी एका लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनला रिप्लेस करत अभिनेता विक्रातं मेस्सी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटासाठी विक्रांतच्या मेस्सीच्या नावाला मेकर्सनी पसंती दर्शवली आहे, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.