हृदय पिळवटून टाकणारी कथा अन् जबरदस्त सस्पेन्स! 'OTT'वरील हा चित्रपट पाहून 'सैयारा', 'धडक-२' विसराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 15:31 IST2025-08-04T15:28:14+5:302025-08-04T15:31:39+5:30
यंदाचं वर्ष हे रोमॅन्टिक चित्रपटांसाठी खास असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे.

हृदय पिळवटून टाकणारी कथा अन् जबरदस्त सस्पेन्स! 'OTT'वरील हा चित्रपट पाहून 'सैयारा', 'धडक-२' विसराल
Bollywood Movie: हिंदी सिनेसृष्टीत सध्या रोमॅन्टिक चित्रपटांची चलती असल्याची पाहायला मिळते आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सैयाराने बॉक्स ऑफिसवर अक्षरश धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले आहेत. अहान पांडे आणि अनीत पड्डाची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या हा चित्रपट चर्चेत असतानाच धडक-२ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु, असाच एक चित्रपट जो पाहिल्यानंतर तुम्ही सैयारा आणि धडक-२ विसराल. या चित्रपटाचं नाव मसान आहे. या चित्रपट विकी कौशल प्रमुख भूमिकेत आहे.
'मसान' हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून विकी कौशलने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या चित्रपटाचं दिग्दर्शनाची धुरा नीरज घायवान यांनी सांभाळली होती.परंतु, त्यावेळी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटात विकी कौशलसोबत श्वेता त्रिपाठी आणि रिचा चढ्ढा देखील मुख्य भूमिकेत होत्या.
दरम्यान, 'मसान' हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. याचा शेवटचा हळवा आहे. १ तास ३७ मिनिटांचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. चित्रपटात पहिल्यांदा श्वेता त्रिपाठी विकी कौशलसोबत दिसतेय, तर दुसरीकडे रिचा चढ्ढाची प्रेमकहाणीही दाखवली आहे. सुरुवातीला तुम्हाला या चित्रपटात रोमान्स पाहायला मिळतो, पण नंतर तो एक थ्रिलर कहाणी दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात प्रेमकथा दाखवण्यात आली असली तर सस्पेन्स जबरदस्त आहे.
लॉकडाऊन दरम्यान विकी कौशलच्या या चित्रपट सर्वाधिक चर्चेत आला. त्याचकाळात या चित्रपटातील काही सीन्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. यानंतर, चित्रपटाला खूप पसंती मिळाली. हा चित्रपट 'सैयारा' आणि 'धडक-२' ला कॉंटे की टक्कर देईल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.