सोनेरी केस अन् निळे डोळे; इंग्रज अधिकारी साकारणारा 'हा' अभिनेता आठवतोय? कर्करोगाशी लढा दिला पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:19 IST2025-10-03T15:12:54+5:302025-10-03T15:19:25+5:30
अभिनयासह क्रीडा पत्रकार म्हणूनही मिळाली प्रसिद्धी, हिंदी चित्रपटातील इंग्रज अधिकारी साकारणारा 'हा' अभिनेता आठवतोय?

सोनेरी केस अन् निळे डोळे; इंग्रज अधिकारी साकारणारा 'हा' अभिनेता आठवतोय? कर्करोगाशी लढा दिला पण...
Bollywood Actor: ८०-९० च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये इंग्रज अधिकारी किंवा विदेशी स्मगलर, प्रामुख्याने अशा भूमिकांमध्ये दिसणारा एक चेहरा म्हणजे अभिनेते टॉम अल्टर. मर्दानी डौल, कणखर आवाज लाभलेले टॉम अल्टर प्रत्येक भूमिकेत अगदी जिवंतपणा आणत असतं. मुळात टॉम अल्टर या नावामुळे चटकन अमेरिकन किंवा ब्रिटिश वाटणारा हा अभिनेता-मनाने मात्र पक्का भारतीय होता. आपल्या कारकिर्दीत जवळपास ३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. आपल्या खलनायिका भूमिकांमुळे नावाजलेल्या या अभिनेत्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत...
टॉम ऑल्टर यांचा जन्म २२ जून १९५० रोजी उत्तर प्रदेशातील मसूरी येथे झाला. स्वातंत्र्यापूर्वी त्यांचे आजी आजोबा अमेरिकेतून भारतात आले होते. त्यानंतर त्यांचे कुटुंब भारतातच स्थायिक झाले होते. अमेरिकेत शिक्षण घेतल्यानंतर ते सुरुवातीला हरियाणामध्ये एका शाळेत शिक्षकाची नोकरी करत होते. इतकंच नाहीतर त्यांनी क्रीडा पत्रकार म्हणूनही काम पाहिलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी टीव्हीसाठी त्याची मुलाखत घेणारे टॉम अल्टर हे पहिले पत्रकार होते.
अभिनय कारकिर्द
१९७७ मध्ये देव आनंद अभिनीत 'साहेब बहादूर' या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला, परंतु रामानंद सागर दिग्दर्शित १९७६ मध्ये धर्मेंद्र यांची मुख्य भूमिका असलेल्या चरस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.'शतरंज के खिलाड़ी', हम किसी से कम नहीं, परवरिश, राम भरोसे, नौकरी, देस परदेस, जूनून, क्रांति, कुदरत, आशिकी, जानी दोस्त, रोमांस आणि कर्मा यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकाच्या भूमिका साकारल्या होत्या.
टॉम अल्टर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी १९७७ मध्ये कॅरोल इन्हास यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दोन अपत्ये आहेत. अखेरीस त्वचेच्या कर्करोगाशी लढा देत असताना २९ सप्टेंबर २०१७ ला टॉम ऑल्टर यांनी जगाचा निरोप घेतला.