​बॉलिवूडला शाहरूख खान सारखा ‘सुपरस्टार’ देणारे दिग्दर्शक लेख टंडन यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 11:44 IST2017-10-16T06:14:59+5:302017-10-16T11:44:59+5:30

सुप्रसिध्द अभिनेते आणि सिनेदिग्दर्शक लेख टंडन यांचे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास  निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. लेख टंडन ...

Bollywood actor Tandon passed away as 'superstar' for Shahrukh Khan | ​बॉलिवूडला शाहरूख खान सारखा ‘सुपरस्टार’ देणारे दिग्दर्शक लेख टंडन यांचे निधन

​बॉलिवूडला शाहरूख खान सारखा ‘सुपरस्टार’ देणारे दिग्दर्शक लेख टंडन यांचे निधन

प्रसिध्द अभिनेते आणि सिनेदिग्दर्शक लेख टंडन यांचे रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास  निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. लेख टंडन गत काही महिन्यापासून  आजारी होते. अखेर पवई येथील आपल्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



 बॉलिवूडला शाहरूख खान नावाचा सुपरस्टार देणारे लेख टंडन यांनी अनेक मालिका व चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सोबतच ‘रंग दे बसंती’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सारख्या चित्रपटांत ते अभिनय करतानाही दिसले. शाहरूखच्या ‘स्वदेश’ या चित्रपटातही ते अभिनय करताना दिसले होते. ‘फरमान’ या टीव्ही सीरियलचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. शाहरूख खान याला शोधण्याचे श्रेय लेख टंडन यांना दिले जाते. त्यांनीच ‘दिल दरिया’ या टीव्ही सीरिअलसाठी शाहरूखला कास्ट केले होते.  १३ फेब्रवारी १९२९ रोजी लाहोर येथे लेख टंडन यांचा झाला.  पुढे लेख टंडन यांनी बॉलिवूडमध्ये दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामागे पृथ्वीराज कपूर यांचा हात होता. लेख यांना चित्रपटसृष्टीत येण्यासाठी पृथ्वीराज कपूर यांनी प्रेरित केले होते. पृथ्वीराज कपूर हे त्यांच्या वडिलांचे मित्र होते. 

उत्तरायण, आम्रपाली, प्रोफेसर, झुक गया आसमान, जहा प्यार मिले, आंदोलन, दुल्हन व्ही जो पिया मन भाये, शारदा, एक बार कहो, अगर तुम ना होते, दुसरी दुल्हन, मिल गयी मंजिल मुझे त्यांचे हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. ‘आम्रपाली’ या चित्रपटातून लेख टंडन यांनी आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. या चित्रपटात वैजयंती माला व सुनील दत्त लीड रोलमध्ये होते. आपल्या या पहिल्याच चित्रपटाद्वारे ते आॅस्करपर्यंत पोहोचले होते. लेख टंडन यांचा ‘आम्रपाली’ हा चित्रपट भारताकडून ३९ व्या आॅस्कर अवार्डसाठी पाठवण्यात आला होता.

Web Title: Bollywood actor Tandon passed away as 'superstar' for Shahrukh Khan