'कांतारा चॅप्टर-१' सिनेमा कसा वाटला? सुनील शेट्टीने सांगितला अनुभव, म्हणाला- "हा चित्रपट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:26 IST2025-10-12T13:22:47+5:302025-10-12T13:26:00+5:30

"माझ्या डोळ्यात पाणी...",'कांतारा चॅप्टर-१' बघून सुनील शेट्टी भारावला, सांगितला हृदयस्पर्शी अनुभव 

bollywood actor suniel shetty praises rishab shetty kantara chapter 1 movie share post | 'कांतारा चॅप्टर-१' सिनेमा कसा वाटला? सुनील शेट्टीने सांगितला अनुभव, म्हणाला- "हा चित्रपट..."

'कांतारा चॅप्टर-१' सिनेमा कसा वाटला? सुनील शेट्टीने सांगितला अनुभव, म्हणाला- "हा चित्रपट..."

Suniel Shetty Post: 'कांतारा' चित्रपटाप्रमाणेच दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर-१' हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.  सध्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश धुमाकूळ घातला असून सर्वत्र त्याचीच चर्चा होताना दिसते आहे. या चित्रपटाची आगवेळी कथा, कलाकारांचा अभिनय या सगळ्या गोष्टी जुळून आल्याने  अनेकजण तसेच समीक्षक चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. शिवाय या चित्रपटावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अशातच 'कांतारा चॅप्टर -१' बद्दल  अभिनेता सुनील शेट्टीने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. 

'कांतारा चॅप्टर १' हा ब्लॉकबस्टर 'कांतारा'  सिनेमाचा प्रीक्वल आहे.  या चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.  या चित्रपटाने अनेक बिग बजेट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत त्यांना मागे टाकलं आहे. २ ऑक्टोबरला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यात आला. अलिकडेच मुंबईत या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं.त्यादरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनेही हजेरी लावली होती. दरम्यान, हा चित्रपट पाहून सुनील शेट्टी भारावून गेला. अभिनेत्याने त्याच्या एक्स अकाउंटवर याबद्दल खास पोस्ट लिहून सिनेमाच्या सिनेमॅटोग्रॅफीचं तसंच ऋषभ शेट्टीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. 

या पोस्टद्वारे सुनील शेट्टी व्यक्त होत म्हणाला, काल रात्री कांतारा चॅप्टर १ सिनेमा माझ्या हृदयाला खोलवर स्पर्शून गेला. शिवाय हा चित्रपट इतका अद्भुत, उत्तम  आहे जो पाहून माझ्या अंगावर काटा आला, डोळ्यात पाणी आलं.अभिमानाची भावना जागृत झाली आणि मनाला एक वेगळीच शांती मिळाली. असे कौतुकोद्गार अभिनेत्याने या पोस्टद्वारे काढले आहेत.

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित कांतारा चॅप्टर १ प्रेक्षकांना चांगलाच भावला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. अवघ्या १० दिवसांत बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे.  

Web Title : सुनील शेट्टी ने 'कांतारा चैप्टर-1' की समीक्षा की: एक फिल्म जिसने मेरी आत्मा को छू लिया

Web Summary : सुनील शेट्टी ने ऋषभ शेट्टी की 'कांतारा चैप्टर-1' की प्रशंसा करते हुए इसे गहराई से छूने वाला और भारतीय सिनेमा का सच्चा प्रतिनिधित्व बताया जो अपनी संस्कृति में निहित है। मुंबई में फिल्म की स्क्रीनिंग ने शेट्टी को प्रभावित किया, उन्होंने इसकी सिनेमैटोग्राफी और निर्देशन की सराहना की।

Web Title : Suniel Shetty Reviews 'Kantara Chapter-1': A Film That Touched My Soul

Web Summary : Suniel Shetty praises Rishab Shetty's 'Kantara Chapter-1', calling it deeply moving and a true representation of Indian cinema rooted in its culture. The film's screening in Mumbai left Shetty impressed, lauding its cinematography and direction.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.