ना ख्रिसमस, ना ईद...; 'या' दिवशी प्रदर्शित होणार शाहरुखचा 'किंग' चित्रपट, जाणून घ्या तारीख
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:18 IST2025-05-22T12:11:31+5:302025-05-22T12:18:51+5:30
प्रतीक्षा संपली! ईदला नव्हे तर 'या' दिवशी प्रदर्शित होणार शाहरुखचा 'किंग' चित्रपट; काय आहे कारण?

ना ख्रिसमस, ना ईद...; 'या' दिवशी प्रदर्शित होणार शाहरुखचा 'किंग' चित्रपट, जाणून घ्या तारीख
King Movie Update: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan)सध्या त्याचा आगामी एक्शन थ्रिलर चित्रपट 'किंग' मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरु आणि सुहाना खान अशी बाप-लेकीची जोडी देखील मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर बहुचर्चित किंगमध्ये शाहरुखसह दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ तसेच अरशद वारसी आणि अभय वर्मा अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, येत्या २०२६ या वर्षात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्यांचं म्हटलं जात होतं. त्यात आता आणखी एक अपडेट समोर येत आहे.
शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २०२६ मध्ये ईदच्या निमित्ताने प्रदर्शित केला जाणार होता. परंतु, आता चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, किंग चित्रपटाच्या निर्मात्यांनी येत्या वर्षात गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखल्याची माहिती मिळते आहे. शिवाय दुसऱ्या दिवशी शुक्रवार असल्याने गुड फ्रायडेचा चित्रपटाला चांगला फायदा होऊ शकतो असंही काहींचं म्हणणं आहे. त्याचबरोबर पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, 'किंग' चित्रपटासाठी शाहरुखच्या काही अॅक्शन सीक्वेन्स आधीच शूट झाले आहेत. निर्मात्यांनी त्यांच्या सेटमधून कोणतीही माहिती लीक होऊ नये म्हणून कडक सुरक्षेची व्यवस्था केली आहे. असंही म्हटलं जात आहे.
दरम्यान, किंग चित्रपटाचं सुजॉय घोष याचे दिग्दर्शन करणार आहेत तर सिद्धार्थ आनंद याचे निर्माते आहेत. तसेच हा चित्रपट शाहरुख खानची कंपनी 'Red Chillies Entertainment' च्या बॅनरखाली बनवण्यात येत आहे. हा प्रोजेक्ट शाहरुखच्या खूप जवळचा आहे. या चित्रपटात शाहरुख खान ग्रे भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.