कोरोनाचा कहर! बॉलिवूडच्या आणखी एका दिग्गज अभिनेत्याला कोरोनाची लागण, लक्षणं नाहीत पण टेस्ट पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 10:02 IST2020-05-24T10:01:46+5:302020-05-24T10:02:16+5:30

चिंता वाढली...बॉलीवूड हादरलं!

bollywood actor kiran kumar test positive for coronavirus-ram | कोरोनाचा कहर! बॉलिवूडच्या आणखी एका दिग्गज अभिनेत्याला कोरोनाची लागण, लक्षणं नाहीत पण टेस्ट पॉझिटीव्ह

कोरोनाचा कहर! बॉलिवूडच्या आणखी एका दिग्गज अभिनेत्याला कोरोनाची लागण, लक्षणं नाहीत पण टेस्ट पॉझिटीव्ह

ठळक मुद्देकिरण कुमार यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलेय.  छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्येही त्यांनी काम केले.

संपूर्ण देश कोरोना व्हायरसचा कहर झेलत असताना आता या महामारीने गंभीर रूप धारण केले आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतही या महामारीचा कहर पाहायला मिळतोय. आता बॉलिवूड व टीव्ही इंडस्ट्रीचे सुप्रसिद्ध अभिनेते किरण कुमार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. किरण कुमार यांनी स्वत: याचा खुलासा केला.
विशेष म्हणजे, किरण कुमार यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. याऊपरही ते कोरोना पॉझिटीव्ह आढळले. यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. किरण कुमार यांचे वय 74 वर्षे आहे आणि यामुळे अशास्थितीत त्यांची काळजी घेतली जात आहे.
किरण कुमार गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्या घरात क्वारन्टाइनमध्ये आहेत.

‘टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, 14 मे रोजीच किरण कुमार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करुन घेतले. 10 दिवसांपासून ते क्वारंटाइन असून त्यांची पुढील कोविड-19 टेस्ट 25 मे रोजी घेण्यात येणार आहे.
त्यांना खोकला, ताप नाही तसेच श्वसनाचाही कुठलाही त्रास नाही. किरण कुमार यांनी घराच्या दुस-या फ्लोअरवर स्वत:ला आयसोलेट केले आहे.

किरण कुमार यांनी बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केलेय. तेजाब आणि खुदा गवाह यासारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका केल्या. छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्येही त्यांनी काम केले.
बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वात आधी सिंगर कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर निमार्ता करीम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुली जोआ मोरानी, शाजिया मोरानी कोरोना संक्रमित आढळल्या होत्या. आता सगळे कोरोनामुक्त आहेत.

Web Title: bollywood actor kiran kumar test positive for coronavirus-ram