"लग्न कधी करतोय?" लोकांनी प्रश्न विचारताच कार्तिक लाजला अन् हसला, अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 12:16 IST2024-11-06T12:16:07+5:302024-11-06T12:16:35+5:30

लोकांना कार्तिकला जोरात लग्नाबद्दल विचारलं तेव्हा अभिनेत्याने दिलेली रिअॅक्शन चर्चेत आहे (kartik aryan)

bollywood actor kartik aryan fan teased actor about his marriage video viral | "लग्न कधी करतोय?" लोकांनी प्रश्न विचारताच कार्तिक लाजला अन् हसला, अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेत

"लग्न कधी करतोय?" लोकांनी प्रश्न विचारताच कार्तिक लाजला अन् हसला, अभिनेत्याचा व्हिडीओ चर्चेत

कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३' सिनेमाची सर्वांना चांगलीच उत्सुकता आहे. हा सिनेमा सध्या लोकांचं प्रेम मिळवतोय. 'भूल भूलैय्या ३'ने चार दिवसांतच १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३' सिनेमाचं कथानक आणि मुख्य कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय. अशातच 'भूल भूलैय्या ३' यशस्वी झाल्यावर कार्तिक नुकताच वाराणसीला गेला होता. तिथे लोकांनी लग्नाचा विषय काढताच कार्तिकचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

कार्तिक आर्यनला लोकांनी विचारला लग्नाबद्दल प्रश्न

कार्तिक आर्यन 'भूल भूलैय्या ३' च्या यशानंतर वाराणसीला गंगा आरती करण्यासाठी काल गेला होता. तिथे रात्री कार्तिकला भेटण्यासाठी त्याच्या चाहत्यांची खूप गर्दी झाली होती. कार्तिक आर्यनने सर्वांना भेटून चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. कार्तिकला नंतर लोकांनी लग्नाबद्दल प्रश्न विचारला. इतक्या गर्दीत लोक काय बोलत आहेत हे कार्तिकला कळत नव्हतं. शेवटी "लग्न कधी करणार?" असं लोकांनी जोरात अभिनेत्याला विचारलं.  तेव्हा कार्तिक काहीसा हसला अन् लाजलेला दिसला. तो काहीतरी बोलायला जाणार पण त्याला काही सुचलं नाही. शेवटी हसत हसतच कार्तिक तिथून निघून गेला.


'भूल भूलैय्या ३' चा बॉक्स ऑफिसवर डंका

कार्तिक आर्यनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या  'भूल भूलैय्या ३' सिनेमाला लोकांनी हाऊसफुल्ल प्रतिसाद दिलाय. 'भूल भुलैय्या ३'ने अनुक्रमे १८ आणि १३ कोटींचा बिजनेस केला. 'भूल भुलैय्या ३'ने १३७ कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे कार्तिक आर्यनचा  'भूल भूलैय्या ३' सुपरहिट झालाय. या सिनेमात कार्तिकसोबत तृप्ती डिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

Web Title: bollywood actor kartik aryan fan teased actor about his marriage video viral