"मनावर खूप दबाव…", डिप्रेशनचा शिकार झाला होता करण सिंह ग्रोव्हर; सर्वात कठीण काळात बिपाशाने 'अशी' दिलेली साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 11:27 IST2025-11-13T11:23:52+5:302025-11-13T11:27:02+5:30
करण सिंह ग्रोव्हरला करावा लागला होता नैराश्याचा सामना,'त्या' कठीण काळाबद्दल अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला...

"मनावर खूप दबाव…", डिप्रेशनचा शिकार झाला होता करण सिंह ग्रोव्हर; सर्वात कठीण काळात बिपाशाने 'अशी' दिलेली साथ
Karan Singh Grover: करण सिंह ग्रोव्हर हा हिंदी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. करणने याआधी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.मात्र,करण त्याच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत राहिला. दोन घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्याने २०१६ मध्ये अभिनेत्री बिपाशा बासूसोबत लग्नगाठ बांधली. या जोडप्याला एक गोंडस मुलगी देखील आहे आणि ते त्यांच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड आनंदी आहेत. मात्र, एक वेळ अशी आली होती जेव्हा करणला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं.
नुकत्याच 'पिंकविला' ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे. त्यावेळी करणला नैराश्याचा सामना करावा लागला होता, असा खुलासा देखील त्याने या मुलाखतीमध्ये केला.या मुलाखतीमध्ये अभिनेता म्हणाला," नैराश्य ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला स्वीकारावीच लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर सर्वांनी चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी या परिस्थितीतून जात असतो. कधी नैराश्य हे पैसे कमवण्याचा संघर्ष तर कधी ताणतणावामुळे येतं. त्यामुळे आपल्या मनावर खूप दबाव निर्माण होतो जो पूर्णपणे चुकीचा आहे.आयुष्य हे यापेक्षा खूप मोठं आणि वेगळं आहे. त्यानंतर अभिनेत्याने पत्नी बिपाशाचा त्याला कसा पाठिंबा राहिला, या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी तिने कशी मदत केली,याबद्दल सांगितलं.
दरम्यान, करण सिंह ग्रोव्हरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने २०१५ मध्ये आलेल्या अलोन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.याआधी, तो अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. कसोटी जिंदगी की,कुबूल है यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्याने साकारलेल्या प्रत्येक पात्राचं कौतुक झालं. याशिवाय अलिकडेच २०१४ मध्ये आलेल्या फायटर सिनेमातही तो दिसला. या चित्रपटात त्याने ऋतिक रोशन, दीपिका पादुकोण, अनिल कपूर या मातब्बर कलाकलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली.