पांढरे झालेले केस अन् क्लीन शेव; हँडसम बॉलिवूड अभिनेत्याचा बदलला लूक, ओळखणंही झालं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:01 IST2026-01-29T16:00:59+5:302026-01-29T16:01:37+5:30
एका बॉलिवूड अभिनेत्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून त्यांना ओळखणं कठीण जात आहे.

पांढरे झालेले केस अन् क्लीन शेव; हँडसम बॉलिवूड अभिनेत्याचा बदलला लूक, ओळखणंही झालं कठीण
बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सेलिब्रिटींचे वेगळे लूक पाहायला चाहत्यांनाही आवडतं. आतादेखील एका बॉलिवूड अभिनेत्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून त्यांना ओळखणं कठीण जात आहे. फोटोमध्ये अभिनेत्याचा लूक पूर्णपणे बदलल्याचं दिसत आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून जॉन अब्राहम आहे.
जॉन अब्राहमचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्याने क्लीन शेव केल्याचं दिसत आहे. तर त्याचे केसही पांढरे झाले आहेत. जॉन अब्राहमचा बदललेला लूक पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. हे फोटो पाहून त्याला ओळखणंही कठीण जात आहे. 'आयपीएस राकेश मारीया' या बायोपिकचं शूटिंग सध्या जॉन करत आहेत. त्या सिनेमाच्या शूटिंग सेटवरीलच हे फोटो आहेत. जॉन अब्राहमच्या फॅन पेजवरुन हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
जॉन अब्राहम अलिकडेच प्रदर्शित झालेल्या तरहान सिनेमात दिसला होता. आता 'आयपीएस राकेश मारीया' यांच्या बायोपिकचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर लवकरच जॉन अब्राहम 'फोर्स ३' सिनेमाचं शूटिंगही सुरू करणार आहे. जॉन हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता असून दमदार शरीरयष्टी आणि हँडसम लूकसाठी तो ओळखला जातो.