४० चपात्या अन् १.५ लीटर दूध! बॉलिवूड अभिनेत्याचा दिवसाचा खुराक, तरीही वाढलं नाही वजन, दिसतो फिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 15:58 IST2025-07-10T15:55:52+5:302025-07-10T15:58:23+5:30
४० चपात्या अन् १.५ लीटर दूध! बॉलिवूड अभिनेत्याचा दिवसाचा खुराक, तरीही वाढलं नाही वजन, कसं ते जाणून घ्या

४० चपात्या अन् १.५ लीटर दूध! बॉलिवूड अभिनेत्याचा दिवसाचा खुराक, तरीही वाढलं नाही वजन, दिसतो फिट
Bollwood Actor Diet: आहार हा प्रत्येकाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो. परंतु, सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे एक वेळच्या जेवणाकडे सुद्धा लक्ष देणंही जमत नाही. मात्र, अशातच सेलिब्रिटी मंडळींच्या फिटनेसचं अनेकांना आकर्षण असतं. त्यातच बॉलिवूडमध्ये असेही कलाकार आहेत जे त्यांच्या खास डाएट प्लान आणि जिम रूटीनसाठी प्रसिद्ध आहेत. पण, असाच एक अभिनेता असा आहे जो त्याच्या फिटनेसची कायम चर्चा असते. हा अभिनेता म्हणजे जयदीप अहलावत (Jaideep Ahlawat).
अलिकडेच एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याचा डाएटबद्दल खुलासा केला आहे. जयदीप स्वत;च्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. या मुलाखतीमध्ये जयदीपने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाला, "२००८ पर्यंत माझं वजन ७० किलोपेक्षा जास्त वाढलं नाही. भले मी खूप उंच आहे तरी त्यावेळी मी दिवसाला कमीत कमी ४० चपात्या खायचो. गावाकडील मुलांप्रमाणे थेट शेतात जायचो आणि त्यावेळी ऊस, गाजर, पेरू अशीही फळेही खायचो. मात्र, इतकं खाऊनही त्याचा माझ्या शरीरावर काहीच परिणाम झाला नाही. कारण मी जे काही खात होतो तेवढच काम करायचो त्याच्यामुळे कॅलरीज बर्न व्हायच्या."
त्यानंतर मग अभिनेत्याने म्हटलं, "दूध माझ्या आहाराचा एक अविभाज्य भाग होता की मी दूध प्यायल्याशिवाय एकही दिवस राहू शकत नव्हतो. दिवसातून कमीत कमी तीन वेळा अर्धा लिटर दूध प्यायचो. त्यानंतर मग जसजसे आम्ही मोठे होत गेलो मग आम्हाला ग्लासमध्ये दूध पिण्याची परवानगी नव्हती, तांब्या किंवा स्टिलचा जगामध्ये दुध दिलं जायचं, गावाकडे या गोष्टी अगदीच सामान्य होत्या.
घरचं जेवण आवडीचं...
पुढे अभिनेता म्हणाला, "मी जवळपास १५-१६ वर्षांपासून मुंबईत आहे आणि मला अजूनही घरी बनवलेलं जेवण आवडतं. आजही मी पार्टीला गेलो तरी घरी येऊन घरी बनवलेलंच जेवण खातो." असा खुलासा अभिनेत्याने केला.