"३३ वर्षे चाळीत घालवली, माझ्या पत्नीने तिचं घरं विकलं, कारण..."; जॅकी श्रॉफ भावुक, 'आयशा' यांच्या त्यागाचा सांगितला किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:41 IST2025-07-08T11:37:13+5:302025-07-08T11:41:15+5:30
आलिशान घर सोडून जॅकी श्रॉफसाठी चाळीत राहिली आयशा, संघर्षकाळात पत्नीने खंबीरपणे दिली साथ, म्हणाले- "तिने ३३ वर्षे..."

"३३ वर्षे चाळीत घालवली, माझ्या पत्नीने तिचं घरं विकलं, कारण..."; जॅकी श्रॉफ भावुक, 'आयशा' यांच्या त्यागाचा सांगितला किस्सा
Jackie Shroff & Ayesha Shroff's Love Story :बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांचं नाव हिंदी सिनेसृष्टीत मोठ्या आदराने घेतलं जातं. अनेक दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. प्रचंड संघर्षानंतर त्यांना सिनेसृष्टीत यश मिळालं. दरम्यान, या अभिनय प्रवासात अभिनेत्याच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली. जॅकी श्रॉफ यांनी १९८७ मध्ये पत्नी आयशा यांच्या वाढदिवशी लग्न केलं होतं. जॅकी श्रॉफ एका चाळीत राहत होते तर आयशा एका श्रीमंत कुटुंबातून होती. दोघांमध्ये खूप प्रेम होतं त्यामुळे आयशाने जॅकी श्रॉफसोबत चाळीत राहण्याचा निर्णय घेतला. याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे.
जॅकी श्रॉफ यांनी 'स्क्रीन'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लव्हलाईफबद्दल खुलासा केला. त्यादरम्यान, अभिनेते म्हणाले, 'मी चाळीत राहत होतो आणि माझे घर ३० रुपयांत चालत होतं. माझी पत्नीही माझ्यासोबत चाळीत राहत होती आणि शौचालयाला जाण्यासाठी रांगेत उभी राहायची. मी माझ्या आयुष्यातील ३३ वर्षे चाळीत घालवली. माझ्या पत्नीने तिचे घर विकले जेणेकरून मी नवीन घर खरेदी करू शकेन. माझ्या पत्नीने मला कायम साथ दिली."
त्यानंतर जॅकी श्रॉफ यांना आयशा सोबत लग्न केल्यानंतर त्याला घरच्यांचा विरोध होता का असं विचारण्यात आलं, त्यावर उत्तर देताना जॅकी श्रॉफ म्हणाले, "आयशाच्या वडिलांना आमच्या लग्नाला विरोध नव्हता. त्यांना कदाचित माहित असेल की माझा हेतू चुकीचा नव्हता. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी तो कधीही मोडला नाही."
फिल्मी आहे लव्हस्टोरी...
जॅकी श्रॉफने आणि आयेशा दोघेही 'तेरी बाहों में' चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेले होते. त्याचदरम्यान, त्यांची पहिली भेट झाली. या चित्रपटात जॅकी श्रॉफ यांना काम करण्याची संधी मिळाली नाही पण आयेशा यांना मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट करण्यात आलं होतं. जॅकी श्रॉफ यांना कदाचित ती भूमिका मिळाली नसली तरी त्यांना त्यांचं प्रेम मिळालं होतं. लग्नापूर्वीच या दोघांनी एकमेकांना डेट देखील केलं होतं. सुरूवातीच्या दिवसामध्ये जेव्हा दोघे एकमेकांना डेट करत होते त्यावेळी जॅकी एका चाळीमध्ये राहत होते. तर दुसरीकडे आयशा एका मोठ्या घरातील होती आणि तिची लाईफस्टाइल जॅकीपेक्षा खूप वेगळी होती. दोघांमध्ये कधीच पैशांमुळे वाद झाले नाहीत