६ वर्षात एकही सिनेमा नाही, कुठे गायब झाला 'हम साथ साथ है'चा अभिनेता? राहतोय लाईमलाईटपासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:19 IST2025-08-14T16:12:40+5:302025-08-14T16:19:18+5:30
६ वर्षात एकही सिनेमा नाही, कुठे गायब झाला नूतन यांचा लेक! राहतोय लाईमलाईटपासून दूर

६ वर्षात एकही सिनेमा नाही, कुठे गायब झाला 'हम साथ साथ है'चा अभिनेता? राहतोय लाईमलाईटपासून दूर
Mohnish Bahal: बॉलिवूड इंडस्ट्रीत 'बडे भैया' या नावाने प्रसिध्द असलेला अभिनेता मोहनीश बहल. 'मैंने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'जय हो', 'पानिपत' यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. चित्रपट, मालिका अशा माध्यमातून काम करत या अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र, काही काळानंतर हा अभिनेता इंडस्ट्रीतून गायब झाला. चित्रपटक्षेत्रात विविध लोकांशी कनेक्शन असूनही नूतन यांच्या लेकाला संघर्ष करावा लागला.
मोहनीशने १९८३ मध्ये आलेल्या 'बेकरार' या चित्रपटाद्वारे त्याच्या करियरला सुरुवात केली. पण, हा चित्रपट फारसा चालला नाही. तो या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत झळकला होता. चित्रपटसृष्टीत अपयश पदरी पडल्यानंतर चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण सलमान खानमुळे त्याने हा निर्णय बदलला. सलमान मैंने प्यार किया या चित्रपटात काम करणार होता. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी त्याने बडजात्या कुटुंबियांला मोहनीशचे नाव सुचवले आणि या चित्रपटामुळे त्याच्या करियरला एक दिशा मिळाली. त्याने साकारलेल्या या खलनायकाच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. १९९२ मध्ये त्याने अभिनेत्री एकता सोहिनीसोबत लग्न केलं. या दोघांना दोन मुली आहेत.
मोहनीश बहलला काम मिळत नाही कारण...
मोहनिश बेहेलने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय की, "माझं सिनेमांमध्ये यशस्वी करिअर होतं. पुढे मी माझा मोर्चा मालिकांकडे वळवला. 'दिल मिल गए' सारख्या लोकप्रिय मालिका मी केल्या. परंतु नंतर अचानक मला सिनेमांच्या ऑफर येणं बंद झालं. मी मालिकेत काम करतोय म्हणजे माझ्या तारखांचा प्रॉब्लेम होईल. मला सिनेमांच्या शूटींगसाठी वेळ देता येणार नाही, असा अनेकांचा समज झाला. त्यामुळे मला सिनेमांच्या ऑफर येणं बंद झालं."
अलिकेडच हा अभिनेता २०१९ मध्ये आलेल्या पानीपत चित्रपटात शेवटचा दिसला. सध्या हा अभिनेता त्याच्या कुटुंबीयांसोबत एक साधं-सरळ जीवन जगतो आहे. शिवाय तो चांगल्या कामाच्या प्रतीक्षेत देखील आहे.