"मला उगाच बदनाम केलं...", सेटवर उशीरा येण्याच्या 'त्या' चर्चांवर गोविंदाचं सणसणीत उत्तर! काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:01 IST2025-10-16T11:55:17+5:302025-10-16T12:01:29+5:30
सेटवर उशीरा येण्याच्या त्या चर्चांवर गोविंदाचं सणसणीत उत्तर, म्हणाला-"पाच शिफ्ट करुन..."

"मला उगाच बदनाम केलं...", सेटवर उशीरा येण्याच्या 'त्या' चर्चांवर गोविंदाचं सणसणीत उत्तर! काय म्हणाला?
Govinda: ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे गोविंदा. आपल्या हटके डान्स शैलीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत अभिनेत्याने प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजक केलं. 'साजन चले ससुराल', 'हीरो नंबर वन', 'जिस देश में गंगा रहता है', 'हद कर दी आपने', 'एक और एक ग्यारह' और 'जोड़ी नंबर वन' असा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट त्याने इंडस्ट्रीला दिले. पण, २००० नंतर त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. याचदरम्यान, गोविंदाचे वेळ न पाळण्याबाबतचे अनेक किस्से गाजू लागले. त्याच्या अनेक सहकलाकारांनी यावर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता गोविंदाने भाष्य केलं आहे.
अलिकडेच गोविंदाने 'टू मच विथ ट्विंकल अॅंड काजोल' या शोमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान, अभिनेत्याने त्याच्या करिअरमध्ये घडलेल्या चांगल्या-वाईट गोष्टींविषयी सांगितलं. या शोमध्ये होस्ट ट्विंकल खन्नाने गोविंदासोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना काही किस्से सांगितले. गोविंदासोबत काम करत असताना ते एकाच वेळी १४-१४ चित्रपटांसाठी काम करायचा. कधीकधीतर गोविंदा वेगवेगळ्या कॉस्टच्यूममध्ये यायचा. त्यादरम्यान, सगळे डायलॉग्ज कसे आठवायचे असा प्रश्न ट्विंकलने अभिनेत्याला विचारला. त्याबद्द बोलताना गोविंदा म्हणाला, "सगळे डायलॉग्ज बरोबर लक्षात असायचे. कारण, किर्ती मला नेहमी म्हणायचा, चीची कोणत्याही प्लॅनिंग शिवाय चित्रपट केलाय. तो चाललाच पाहिजे. असं म्हणून तो सतत घाबरवायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे ते सगळे डायलॉग्ज तोंडपाठ असायचे. असं मजेशीर उत्तर गोविंदाने दिलं.
मला बदनाम केलं...
त्यानंतर गोविंदाने तो सेटवर उशीरा येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत म्हणाला," मला बदनाम केलं की मी सेटवर वेळेत येत नाही. एकाचवेळी पाच शिफ्ट करुन वेळेत कोणत्याही चित्रपटाच्या सेटवर पोहोचणं अशक्य होतं, त्यामुळे उशीर व्हायचा. इतकं काम कोणीही करणार नाही. इथे एका चित्रपटाचं शूटिंग केलं की लोक थकून जातात." असं उत्तर देत अभिनेत्याने त्या चर्चांना पूर्णविराम दिला.