एअर होस्टेसच्या प्रेमात त्यानं संसार उधळला; पण नंतर झालं असं काही...; बॉलिवूडच्या नायकाची करुण कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 14:48 IST2025-09-25T14:44:33+5:302025-09-25T14:48:30+5:30
एअर होस्टेसच्या प्रेमात पडला अन् भरला संसार मोडला; पण नंतर झालं असं काही... बॉलिवूडच्या नायकाची करुण कहाणी

एअर होस्टेसच्या प्रेमात त्यानं संसार उधळला; पण नंतर झालं असं काही...; बॉलिवूडच्या नायकाची करुण कहाणी
Firoz Khan: हिंदी चित्रपटसृष्टीत हॉलिवूडपटांसारखे अॅक्शन, रोमान्स सुरु करणारे फॅशन आयकॉन अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते म्हणजे फिरोज खान. दमदार अभिनयशैली, रौबदार आवाज लाभलेले फिरोज खान यांनी आपल्या ५० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत फक्त ५७ चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. १९६९ मध्ये आलेल्या दीदी या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. शर्टाची दोन बटणे उघडी ठेवणारा, टाइट फिटींगची पॅन्ट घालणारा तसंच हातात सिगरेट पकडण्याची स्टाईल असणाऱ्या बॉलिवूडच्या या नायकाने चाहत्यांच्या मनावर आपलं नाव कोरलं आहे. आज या लोकप्रिय नायकाचा जन्मदिवस आहे.
फिरोज खान यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी बंगळूरू येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव सादिक खान तर आईचं नाव फातिमा होतं. तिथेच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईची वाट धरली. त्याचदरम्यान, महाविद्यालयीन शिक्षण घेताना कॉलेजमध्ये नातेवाईकांकडून त्यांची होणारी स्तुती पाहून अभिनय क्षेत्रात काम करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात आला.'रिपोर्ट राजू', 'सैमसन','चार दरवेश', एक सपेरा एक लुटेरा', 'सीआयडी 999' यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी काम केलं. मात्र, मुख्य नायक म्हणून १९६५ साली आलेला ‘उंचे लोग’ या चित्रपटाने यशाच्या शिखरावर पोहोचवलं. या शिवाय १९६९ मधील 'आदमी' या चित्रपटासाठी त्यांना फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला होता. चित्रपटाने फिरोज खान यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील बिग बजेट व गाजलेल्या दिग्दर्शकांच्या कार्यालयाचे दरवाजे उघडले गेले.
फिरोज खान यांची लव्हलाईफ चर्चेत...
फिरोज खान यांचं पहिलं लग्न १९६५ मध्ये झालं होतं. लग्नानंतर पाच वर्षांनी फिरोज व सुंदरी यांची पहिली मुलगी लैलाचा जन्म झाला. त्यानंतर काही वर्षांनी फरदीनचा जन्म झाला. संसार सुखात सुरु होता. पण लग्नानंतर अचानक ज्योतिका धनराजगिर नावाची विदेशी तरुणी त्यांच्या आयुष्यात आली. ती एक एअर होस्टेस होती. तिच्या प्रेमामध्ये फिरोज खान आकंठ बुडाले होते. त्यावेळी फिरोज खान आणि ज्योतिकाच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. ही बातमी पत्नी सुंदरीपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी विरोध करताच फिरोज सुंदरी व मुलांना सोडून ज्योतिकासोबत बेंगळुरुमध्ये लिव्ह इनमध्ये राहायला लागले. त्यांनी पहिली पत्नी सुंदरीसोबत घटस्फोटही घेतला होता. परंतु, ज्योतिकाला या नात्याला नाव द्यायचं होतं. पण चित्रपटसृष्टीत नायक बनण्याचे स्वप्न डोळ्यात असल्याने, हे प्रेम सफल झाले नाही. २७ एप्रिल २००९ मध्ये कर्करोगामुळे फिरोज यांनी इहलोकातून एक्झिट घेतली.