"रीना त्यावेळेस देखील त्याच्यासोबत...", आमिर खानच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल भाऊ फैजल खान काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 16:29 IST2025-08-09T16:27:01+5:302025-08-09T16:29:44+5:30

आमिर खान अन् रीना दत्ताच्या घटस्फोटावर भाऊ फैजल खानची प्रतिक्रिया

bollywood actor faissal khan revelation about brother aamir khan divorce with reena dutta   | "रीना त्यावेळेस देखील त्याच्यासोबत...", आमिर खानच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल भाऊ फैजल खान काय म्हणाला?

"रीना त्यावेळेस देखील त्याच्यासोबत...", आमिर खानच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल भाऊ फैजल खान काय म्हणाला?

Faissal Khan: 'मेला' या चित्रपटातू प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणजे फैजल खान. या चित्रटात त्याने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. त्यानंतर फैजल सिनेइंडस्ट्रीतून गायबच झाला. फॅक्ट्री या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पाभल ठेवलं. फैजल खान बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाऊ आहे. सध्या एका मुलाखतीमुळे हा अभिनेता चर्चेत आला आहे. या मुलाखतीमध्ये फैजल खानने आमिर खान आणि रीना दत्ता यांच्य घटस्फोटावर भाष्य केलं आहे. 

'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत फैजलने पहिल्यांदाच भावाच्या पहिल्या घटस्फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याबद्दल अभिनेता म्हणाला," रीनासोबत माझा चांगला बॉण्ड निर्माण झालं होता. रीना आजपर्यंच माझ्यासोबत खूप चांगली वागली आहे. त्यामुळे त्यांचा असा घटस्फोट होणं माझ्यासाठी धक्काच होता. मी आजही तिचा खूप आदर करतो. ती खूप समजूतदार आहे. पण, जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं. रिना आमिरच्या पाठिशी त्या वेळेस देखील खंबीरपणे उभी होती जेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं. कारण तिचं त्याच्यावरखूप प्रेम होतं. तो देखील एक समजुतदार आणि चांगला माणूस आहे पण त्याच्या आजुबाजूला असणारी लोकं फारशी ठीक नाहीत."

किरण रावबद्दल काय म्हणाला आमिरचा भाऊ

पुढे ते म्हणाले, "किरण आणि माझ्यामध्ये फारसं कधी बोलणं झालं नाही. शिवाय आम्ही कधी भेटलो देखील नाही. त्यामुळे मला तिच्या स्वभाव कसा आहे, वगैरे या बद्दल काहीच नव्हती. त्यामुळे मी यावर जास्त बोलू शकत नाही. २००५ मध्ये जेव्हा आमिरचे लग्न झाले तेव्हा त्याच्या आधी दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. नंतर ते दोघे त्यांच्या कामात व्यस्त झाले आणि मी देखील माझ्या कामामध्ये व्यस्त होतो. शिवाय त्याचवेळी मी दुसऱ्या घरात शिफ्ट झालो. मी अलिकडेच १-२ वेळा गौरीला देखील भेटलो. पहिल्यांदाच माझी आणि गौरीची भेट गेल्यावर्षी तिच्या वाढदिवशी झाली." असा खुलासा अभिनेत्याने केला. 

करिअरसोबतच आमिर चर्चेत असतो ते त्याच्या पर्सनल लाइफमुळे. आमिर खान आणि रीना दत्ताने १९९८६ साली लग्नगाठ बांधली होती. जवळपास १६ वर्षानंतर ते दोघे विभख्त झाले. रीना दत्ताशी घटस्फोटानंतर आमिरने किरण रावशी लग्न केलं होतं. मात्र त्या दोघांचाही घटस्फोट झाला आहे. किरण रावसोबत घटस्फोटानंतर आमिर आता गौरी स्प्रॅट या त्याच्या नव्या गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 

Web Title: bollywood actor faissal khan revelation about brother aamir khan divorce with reena dutta  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.