२० वर्षे एकत्र राहूनही पत्नीचं सत्य समजलं नाही; पहिल्या पतीसोबत घटस्फोट न घेता अभिनेत्याला गंडवलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 14:49 IST2025-09-22T14:47:04+5:302025-09-22T14:49:39+5:30
२० वर्ष दुसऱ्याच्या पत्नीसोबत 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने केलेला संसार, असं आलं सत्य समोर

२० वर्षे एकत्र राहूनही पत्नीचं सत्य समजलं नाही; पहिल्या पतीसोबत घटस्फोट न घेता अभिनेत्याला गंडवलं अन्...
Bollywood Actor: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत,जे स्वतःला मुख्य
भूमिकेत सिद्ध करण्यासाठी सतत धडपड करत राहिले. अशाच अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे दीपक तिजोरी. अभिनेता दीपक तिजोरी हा ९० च्या दशकातील आघाडीचा अभिनेता होता. आशिकी,जो जिता वही सिकंदर, कभी हा कभी ना यांसारख्या चित्रपटांमधून त्याने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. मात्र, या अभिनेत्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे तो चर्चेत आला होता. दीपकच्या वैवाहिक आयुष्यात घडलेल्या एका घटनेने अनेकांना धक्का बसला होता.
अनेक गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये नायकाच्या खास मित्राची भूमिका साकारणारा सहाय्यक अभिनेता म्हणून दीपक तिजोरी कायम ओळखला जातो. दीपक तिजोरी याचा जन्म २८ ऑगस्ट १९६१ रोजी मुंबईत झाला. सुरुवातीपासूनच त्याला अभिनयाची गोडी लागली होती.१९८८ मध्ये रमेश तलवार दिग्दर्शित 'तेरा नाम मेरा नाम' या चित्रपटातून त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. मात्र, त्याला महेश भट्ट यांच्या आशिकी चित्रपटाने खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटांनंतर त्याला मित्राच्या भूमिकेसाठी बरेच रोल ऑफर झाले.असंही म्हटलं जातं की, बऱ्याच वेळा चित्रपटांमध्ये नायक नायिकेच्या निवडीआधी नायकाचा मित्र म्हणून दीपक तिजोरीची निवड केली जायची.त्याने हू तू ने रामतुडी आणि माडी जया या दोन गुजराती चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
पत्नीने घरातून हाकललं...
२०१७ मध्ये विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून दीपकला पूर्वाश्रमीची पत्नी शिवानीने राहत्या घरातून हाकलून दिलं होतं. इकतंच नाही तर त्याला घरातील एका खोलीत डांबून ठेवण्यात आलं होतं, अशीही धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर दीपक काही दिवस त्याच्या मित्राकडेच राहत होता. या प्रकारानंतर तो आपल्या या पत्नीवर कारवाई करण्यासाठी तो वकिलाकडे गेला. मात्र, त्याला कळलं की शिवानीने तिच्या आधीच्या पतीला घटस्फोट न देता दीपकशी लग्न केलं होतं.