"लग्नाला एक्सपायरी डेट असावी", पत्नी काजोलच्या 'त्या' वक्तव्यानंतर अजय देवगण म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:20 IST2025-11-15T14:15:51+5:302025-11-15T14:20:37+5:30
पत्नी काजोलच्या लग्नाबद्दलच्या वक्तव्यावर अजयची पहिली प्रतिक्रिया,म्हणाला...

"लग्नाला एक्सपायरी डेट असावी", पत्नी काजोलच्या 'त्या' वक्तव्यानंतर अजय देवगण म्हणाला...
Kajol And Ajay Devgan: अभिनेत्रीनं कसं वागावं, कसं दिसावं याची चौकट मोडणारी, व्यावसायिक सिनेमांतही सशक्त अभिनय करणारी अभिनेत्री म्हणजे काजोल.९० च्या दशकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये काजोलचे नाव घेतले जाते. १९९२, दिग्दर्शक राहुल रवैल यांच्या ‘बेखुदी’ या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. १९९३ साली शाहरूख खानसोबतचा बाजीगर हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला.त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. आपल्या आजवरच्या सिनेकारकिर्दीत तिने सुपरहिट सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. सध्या काजोल एका पॉडकास्टमध्ये तिने केलेल्या लग्नाबद्दलच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. त्यावर आता पती अजय देवगणने प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्रीने काजोलने टॉल्क शो 'टू मच विथ काजोल अॅंड ट्विंकल' या शो मुळे चर्चेत आली आहे. या बहुचर्चित शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अलिकडेच या पॉडकास्टमध्ये अभिनेता विकी कौशल आणि क्रिती सनॉन आली होती. त्यादरम्यान, त्याना लग्नाला एक्सपायरी डेट असावी का असा प्रश्न विचारला गेला. यावर ट्विंकलने मोजक्यांच शब्दात उत्तर दिलं. पण, काजोलने या मुद्यावर केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. आता यावर अभिनेत्रीचा पती अजय देवगणने त्याचं मत मांडलंय.
सध्या अजय देवगण 'दे दे प्यार दे -२' चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्याने प्रेमाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी आर.माधवन देखील उपस्थित होता.यावर बोलताना अजय म्हणाला, "हल्ली प्रेम हा शब्द लोक अगदी कॅज्युअली घेतात. या शब्दचा विनाकारण वापर करत त्याचं महत्त्व कमी करण्यात आलंय.आमच्यावेळी एखाद्यासमोर आपल्या भावना व्यक्त करणं हीच मोठी गोष्ट होती.आताच्या लोकांना या शब्दाचं महत्त्व कळतंच नाही. काही लोक याचा आपल्या पद्धतीने वापर करतात." असं स्पष्ट मत अभिनेत्याने यादरम्यान मांडलं.
काजोल काय म्हणालेली?
"माझा नक्कीच असा विचार आहे की, लग्नाला एक्सपायरी डेट असावी. कारण, योग्य वेळी योग्य व्यक्तीसोबत तुमचं लग्न होईल, याची काही खात्री नसते. त्यामुळे लग्नाला पर्याय असणं गरजेचं आहे. जल लग्नाला एक्सपायरी डेट असेल तर कोणालाही जास्त काळ त्रास सहन करावा लागणार नाही." असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं होतं.