गोष्ट आपली प्रत्येकाची! हसवणारी, मनाला भिडणारी, मोटिव्हेट करणारी... आशिष विद्यार्थी यांच्या 'कहानीबाज'ची न्यारी कहाणी...
By कोमल खांबे | Updated: February 16, 2026 15:51 IST2026-02-16T15:50:12+5:302026-02-16T15:51:59+5:30
आशिष विद्यार्थी खरं तर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध नाव. त्यांना पाहिलं की आठवतो बॉलिवूड सिनेमांचा व्हिलन. पण इतके मोठे सेलिब्रिटी असूनही त्यांची कहाणी आपल्याला आपलीच असल्यासारखी का वाटते? कारण आशिषजी तुमच्या आमच्यासारखेच आहेत. त्यांनाही आपल्यासारखेच चांगले-वाईट अनुभव आलेत, जे ते स्टँडअपच्या माध्यमातून सांगतात. आणि 'कहानीबाज' या शोमधून 'एन्टरटेन्मेंट फॅक्टरी' या कंपनीच्या सोबतीने ते त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या कहाण्या लोकांपर्यंत घेऊन जात आहेत.

गोष्ट आपली प्रत्येकाची! हसवणारी, मनाला भिडणारी, मोटिव्हेट करणारी... आशिष विद्यार्थी यांच्या 'कहानीबाज'ची न्यारी कहाणी...
सपनों की खासियत क्या होती है की सपने कभी पुरे नही होते...आप देखते है सपने? ऐसे सपने है ना जो पुरे नही हुए? इसका मतलब है की आप जिंदा है... क्योंकी सपने सोने के बाद नही देखे जाते... जब आप सपने देखते है तो आपको नींद नही आती... सपने आपको जगाए रखते... जलाए रखते है...
एखादं मोटिव्हेशनल स्पीच वाचतोय असं वाटलं ना? हे वाचून तुम्हाला देखील तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्नं आठवली का? आपण सगळेच रोज स्वप्नं पाहतो. कधी तरी ती पूर्ण होतील या आशेने. काही पूर्ण होत, काही होत नाहीत. मग, जी स्वप्नं पूर्ण झाली त्याने आनंदी व्हायचं की जी अपूर्ण राहिली त्याचं वाईट वाटून घ्यायचं?... याचं गमक वरच्या ओळींमध्ये आहे. प्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्या हटके शोमधील स्वप्नांबद्दलचं हे सत्य मनात घर करून राहतं.
आशिष विद्यार्थी खरं तर बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध नाव. त्यांना पाहिलं की आठवतो बॉलिवूड सिनेमांचा व्हिलन. पण इतके मोठे सेलिब्रिटी असूनही त्यांची कहाणी आपल्याला आपलीच असल्यासारखी का वाटते? कारण आशिषजी तुमच्या आमच्यासारखेच आहेत. त्यांनाही आपल्यासारखेच चांगले-वाईट अनुभव आलेत, जे ते स्टँडअपच्या माध्यमातून सांगतात. आणि 'कहानीबाज' या शोमधून 'एन्टरटेन्मेंट फॅक्टरी' या कंपनीच्या सोबतीने ते त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या कहाण्या लोकांपर्यंत घेऊन जात आहेत.
आशिषजी सांगतात, "आपल्या आजूबाजूला नकारात्मकता पसरलेली आहे. त्यामुळे मला असं वाटलं की मी अशा कहाण्यांमधून लोकांमध्ये उमेद निर्माण करू शकेन. माझ्या आयुष्यातही मला अनेकदा आशा निर्माण करावी लागली आहे. अनेकदा मी निराश व्हायचो. लोक बरंच काही बोलतात. उलटसुलट. दोन्ही बाजूंनी. पण मी नेहमी माझ्या मनाला वाटेल तेच केलं. मला हे लोकांना सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवन जगू शकता. मी माझ्या 'कहानीबाज' शोमध्ये माझ्या लहानपणापासूनच्या कथा सांगतो. प्रत्येक शोमध्ये मी वेगळ्या कथा सांगतो. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात हे घडत असतं. त्यामुळे प्रत्येकाला ती गोष्ट आपली वाटते आणि तो तिच्यात गुंततो, जोडला जातो. कधी हसतो, कधी हळवा होतो, कधी सुखावतो, तर कधी अंतर्मुख होतो".
आप कभी गिरे है? धडाम से...बडे होने के बाद? मै गिरा हूँ...कई बार...उसने कमाल की चीजे सिखाई है मुझे...सबसे पहले ये की शरमिंदा होके कुछ नही मिलता...अगर गिरे हो तो उसे हँडल करना पडेगा...और अगर गिरे हो तो अपने को मॅनेज करके दोबारा खडे करना है और चलते रहना है...
"Stories That Heal" आशिष विद्यार्थींच्या कथा या फक्त कथा नाहीत तर त्यातून चाहत्यांना एक नवी उमेद आणि प्रेरणा मिळते. चाहत्यांना कहाण्यांमधून आशेचा किरण दाखवणारे आशिष विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात आपल्या आई-वडिलांनाच आदर्श मानतात. ते म्हणतात, "मला आयुष्यात खूप काहीतरी कमाल करायचं आहे. पण त्यासाठी काहीतरी चमत्कार घडेल याची मी वाट पाहत बसणार नाही. तर माझ्याकडे जे काही ग्रेट आहे त्यावर मी माझं आयुष्य जगेन. आपण आपले आदर्श आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये शोधले पाहिजेत. आपण कुठल्या तरी मोठ्या स्टारला आपले आदर्श मानतो. पण मी माझ्या आई-वडिलांनाच माझे आदर्श मानतो आणि त्यांच्यादेखील कहाण्या शोमध्ये सांगतो".
दोस्त कमाल के होते है...वो अगर पुछे की तु कैसा है... तो आप कह सकते है...आज अच्छा नही चल रहा यार. दोस्त एक झप्पी मारता है और कहता है...ए चल ऐसे नही रहेगा तू... दोस्त खास होता है क्योंकी दोस्त के सामने आपको बन ठन के जाना नही पडता...दोस्त आपको देखता है और आपके दिल की बात समज लेता है...दरसल अच्छे दोस्त के लिए...ना आपको सीव्ही चाहिए ना बडा घर...ना बडी गाडी...सिर्फ एक चीज चाहिए दोस्त...एक अच्छा दोस्त...
आशिषजींच्या कहाण्या या नवी ऊर्जा देण्यासोबतच तुम्हाला आठवणीत घेऊन जातात. सिनेमा हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने कहानीबाजमध्ये सिनेमाशी संबंधित काही आठवणी, पडद्यामागचे किस्से येतात, पण त्या 'रील लाइफ'पेक्षा हा शो 'रिअल लाइफ'चं दर्शन घडवतो, एक सकारात्मकता देतो. आशिषजींना जवळून पाहण्याची, त्यांचे अनुभव जाणून घेण्याची, त्यांचे शो लाइव्ह ऐकण्याची संधी आता USA मध्येही मिळणार आहे. आशिषजींच्या कहाण्या मनाला भिडतात कारण तेदेखील आपल्यासारखेच, आपल्यातलेच एक आहेत... त्यामुळे त्या गोष्टी आपल्या वाटतात, आपलेपणाच्या वाटतात!