खऱ्या आयुष्यात झीनत अमान आहे रजा मुराद यांची बहीण; सिनेमात दिला होता या भावंडांनी रेप सीन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:30 AM2023-11-23T11:30:31+5:302023-11-23T11:30:59+5:30

Raza murad: रजा मुराद आणि झीनत अमान हे दोघं चुलत भावंडं असून त्यांच्या एका रेप सीनने खळबळ उडाली होती.

bollwyood-actor-raza-murad-convinced-by-cousin-sister-zeenat-aman-rape-scene-with-her | खऱ्या आयुष्यात झीनत अमान आहे रजा मुराद यांची बहीण; सिनेमात दिला होता या भावंडांनी रेप सीन

खऱ्या आयुष्यात झीनत अमान आहे रजा मुराद यांची बहीण; सिनेमात दिला होता या भावंडांनी रेप सीन

आपल्या खलनायिकी भूमिकेमुळे 80-90 चा काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे रजा मुराद. कित्येक वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्याची प्रत्येक भूमिका गाजली. यात खासकरुन त्यांच्या खलनायिकी भूमिकांना प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली.  रजा मुराद यांना त्यांच्या कुटुंबाकडून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडीलदेखील लोकप्रिय अभिनेता होते. इतकंच नाही तर त्याकाळची प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान या रजा मुराद यांच्या नात्याने बहीण लागतात. मात्र, एका सिनेमात रजा मुराद यांनी झीनत अमान यांच्यासोबत रेप सीन केला होता. यावेळी त्यांनी पर्सनल लाइफ बाजूला ठेवत प्रोफेशनल लाइफकडे लक्ष दिलं होतं. 

आपल्या भारदस्त आवाजामुळे इंडस्ट्रीत स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या रजा मुराद यांनी 'एक नजर',  'रोटी कपड़ा और मकान', 'नालायक', 'जानी दुश्मन', 'प्रेम रोग', 'राम तेरी गंगा मैली' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं होतं. यात एका सिनेमात त्यांना झीनत अमान यांच्यासोबत रेप सीन करावा लागला होता.

रजा मुराद आणि झीनत अमान हे दोघं चुलत भावंडं आहेत. या जोडीने काही सिनेमांमध्ये एकत्रही काम केलं आहे. मात्र, त्यांच्या एका रेप सीनने खळबळ उडाली होती. सुरुवातील हा सीन करण्यास त्यांनी नकार दिला होता. मात्र, नंतर मेकर्सने समजावल्यानंतर त्यांनी तो सीन केला.

१९८७ मध्ये प्रदर्शित झालेला 'डाकू हसीना' या सिनेमामध्ये झीनत अमान या लीड रोलमध्ये होत्या. तर, रजा मुराद खलनायिकी भूमिका साकारत होते. सिनेमाच्या स्क्रिप्टनुसार, या सिनेमात त्यांनी रेप सीन शूट करायचा होता. परंतु, या सीनविषयी कळताच त्यांनी नकार दिला. झीनत बहीण असल्यामुळे तिच्यासोबत असा सीन देण्यास त्यांनी साफ नकार दिला. त्यांच्या नकारामुळे सिनेमाची टीम चिंतेत पडली होती. परंतु, झीनत अमान यांनी समजूत काढल्यानंतर ते या सीनसाठी तयार झाले.

दरम्यान, डाकू हसीना या सिनेमात रजा मुराद यांनी भंवर सिंह ही भूमिका साकारली होती. आपण प्रोफेशनल आर्टिस्ट आहोत. त्यामुळे पडद्यावर काम करताना आपलं नातं विसरुन आपल्याला ती भूमिका केली पाहिजे, असं झीनत अमान यांनी सांगितलं. त्यानंतर रजा मुराद यांनी या सीनसाठी होकार दिला.

Web Title: bollwyood-actor-raza-murad-convinced-by-cousin-sister-zeenat-aman-rape-scene-with-her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.