बॉबी देओलसारखाच हँडसम आहे त्याचा मुलगा आर्यमान, आजोबा धर्मेंद्र यांच्या आहे अतिशय जवळचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 16:40 IST2020-05-16T16:36:10+5:302020-05-16T16:40:59+5:30
तो लाईम लाईटपासून दूर राहणं पसंत करतो.

बॉबी देओलसारखाच हँडसम आहे त्याचा मुलगा आर्यमान, आजोबा धर्मेंद्र यांच्या आहे अतिशय जवळचा
लॉकडाऊनमुळे सध्या सगळे कलाकार आपल्या आपल्या घरात आहेत. सोशल मीडियाच्या मदतीने ते फॅन्सशी संपर्कात आहेत. बॉलिवूडचे कलाकार सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहेत. याचाच परिणाम रोज कोणाचा ना कोणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. सध्या सोशल मीडियावर एका स्टारकिड्चा फोटो व्हायरल होतो आहे.
तो फोटो आहे बॉबी देओलचा मुलगा आर्यमान देओलचा. वडिलांसोबतचा त्याचा फोटो व्हायरल होतो आहे. ज्यात तो खूपच हँडसम दिसतोय. विरल भयानीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉबी देओल आणि आर्यमानचा फोटो शेअर केला आहे. आर्यमान इतर स्टाककिड्स पेक्षा वेगळा आहे. मीडियापासून आणि लाईम लाईटपासून तो दूर राहणं पसंत करतो.
आर्यमानची पहिली झलक बॅंकॉकमध्ये झालेल्या IIFA सोहळ्यावेळी बघायला मिळाली होती. बॉबीसोबत आर्यमान आला होता.आर्यमान हा धर्मेंद्र यांचासारखाच हॅंडसम दिसतो अशा प्रतिक्रिया येत आहेत. आजोबा धर्मेंद्र यांचा आर्यमान फार लाडका असून अत्यंत जवळ आहे. आर्यमान अनेक वेळा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच आर्यमानने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधले आहे.