बॉबी देओलचा मुलगा आर्यमानला ‘यशराज’ची ऑफर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 10:38 IST2019-03-07T10:37:11+5:302019-03-07T10:38:16+5:30

होय, ताजी बातमी खरी मानाल तर अभिनेता बॉबी देओलचा मुलगा आर्यमान याला यशराज प्रॉडक्शनकडून चित्रपटाची ऑफर आली.

bobby deol son aryaman deol got a film offer from yashraj productions | बॉबी देओलचा मुलगा आर्यमानला ‘यशराज’ची ऑफर!!

बॉबी देओलचा मुलगा आर्यमानला ‘यशराज’ची ऑफर!!

ठळक मुद्दे‘रेस 3’ या चित्रपटाच्या रिलीजवेळी आर्यमान चर्चेत आला होता. बॉबी देओल आर्यमानला घेऊन आयफा अवार्डमध्ये पोहोचला होता. यानंतर बॉबी व त्याच्या लेकाचे फोटा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

बॉलिवूडमध्ये स्टारकिड्सच्या डेब्यूचा ‘सिलसिला’ सुरु आहे. ईशान खट्टर, जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे यांच्यानंतर जावेद जाफरीचा मुलगाही संजय लीला भन्साळींच्या बॅनरखाली बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. आता आणखी एका स्टारकिडच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा जोरात आहे. होय, ताजी बातमी खरी मानाल तर अभिनेता बॉबी देओलचा मुलगा आर्यमान याला यशराज प्रॉडक्शनकडून चित्रपटाची ऑफर आली. अर्थात आर्यमानने ही ऑफर नाकारली.


बॉलिवूड लाईफने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी बॉबीने मुलगा आर्यमानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. बॉबीच्या या हॅण्डसम मुलाला पाहून सगळेच त्याच्या प्रेमात पडले होते. यानंतर लगेच यशराज बॅनरने आर्यमानला चित्रपट ऑफर केला. यशराजच्या मते, आर्यमानमध्ये हिरो होण्याचे सगळे गुण आहेत. पण  आपल्या मुलाचे सध्याचे वय हे शिक्षणाचे वय आहे, असे बॉबीला वाटते, त्यामुळे बॉबीने म्हणे ही ऑफर नाकारली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच आर्यमान चित्रपटात येईल, असे बॉबीने स्पष्ट केले.


‘रेस 3’ या चित्रपटाच्या रिलीजवेळी आर्यमान चर्चेत आला होता. बॉबी देओल आर्यमानला घेऊन आयफा अवार्डमध्ये पोहोचला होता. यानंतर बॉबी व त्याच्या लेकाचे फोटा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आर्यमानमध्ये त्याचे आजोबा धर्मेन्द्र याची झलक दिसते, असे लोकांनी म्हटले होते. अनेकांनी आर्यमान व धर्मेन्द्र यांच्या तरूणपणीच्या फोटोंचे कोलाज बनवून सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे आर्यमान चित्रपटात आलाच तर तो आजोबा धर्मेन्द्र यांच्याप्रमाणे नाव काढेल, असे मानले जातेय. पण तूर्तास तरी आर्यमानच्या डेब्यूसाठी आपल्याला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: bobby deol son aryaman deol got a film offer from yashraj productions