'सैयारा' पाहिल्यानंतर बॉबी देओल खूप रडला, म्हणाला "जणू माझ्या स्वतःच्या मुलाने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 12:57 IST2025-08-10T12:52:34+5:302025-08-10T12:57:04+5:30
'सैयारा' चित्रपट पाहिल्यानंतर बॉबी देओल खूप भावनिक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले.

'सैयारा' पाहिल्यानंतर बॉबी देओल खूप रडला, म्हणाला "जणू माझ्या स्वतःच्या मुलाने..."
Bobby Deol On Saiyaara: मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रमी कामगिरी केली आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. जगभरात या चित्रपटाने तब्बल ५०० कोटींपेक्षा जास्त तर भारतात ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून, अजूनही त्याची यशस्वी घोडदौड सुरू आहे. या यशानंतर अभिनेता बॉबी देओलने अहान पांडेच्या दमदार डेब्यूबद्दल आनंद व्यक्त केला.
हिंदुस्थानच्या वृत्तानुसार, 'सैयारा' चित्रपट पाहिल्यानंतर बॉबी देओल खूप भावनिक झाला आणि त्याला अश्रू अनावर झाले. बॉबीला अहानचं बालपणही आठवलं. बॉबी म्हणाला, "अहान लहान असताना स्पायडर-मॅनचा पोशाख घालून पंचिंग बॅगवर पंचिंग करायचा. अहानचं पदार्पण मला जणू माझ्या स्वतःच्या मुलाने चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकल्यासारखं वाटलं. 'सैयारा'साठी त्याने आठ वर्षे वाट पाहिली आणि त्याचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे".
बॉबीनं दिग्दर्शक मोहित सुरीचं कौतुक करत म्हटलं, "त्याने पटकथा अप्रतिम रंगवली, कथा आणि संगीत दोन्ही अप्रतिम आहेत". बॉबीच्या मते, अहान आणि अनितची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहणं खूपच मनोरंजक होतं. त्याने दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचं विशेष कौतुक करत, हा चित्रपट दिग्दर्शकाच्या दृष्टीने साकारलेला असल्याचं नमूद केलं. दरम्यान, 'सैयारा'च्या प्रचंड यशानंतर चाहते अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या पुढच्या चित्रपटाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार सुरुवात केलेल्या या नव्या जोडीची पुढची पावले काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.