काय सांगता! बॉबी देओल अन् नीलम लग्न करणार होते, पण ‘डॅडी’ ठरले या प्रेम कहाणीतील विलन...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 12:51 PM2022-01-27T12:51:43+5:302022-01-27T12:52:35+5:30

Bobby Deol Birthday Special: होय, ‘डॅडी’मुळे अधुरी राहिली बॉबी देओलची लव्हस्टोरी, उगाच बदनाम झाली ती पूजा!

Bobby Deol Birthday Special: bobby deol and neelam kothari love story end because of dharmendra | काय सांगता! बॉबी देओल अन् नीलम लग्न करणार होते, पण ‘डॅडी’ ठरले या प्रेम कहाणीतील विलन...!

काय सांगता! बॉबी देओल अन् नीलम लग्न करणार होते, पण ‘डॅडी’ ठरले या प्रेम कहाणीतील विलन...!

googlenewsNext

Bobby Deol Birthday Special:  बॉलिवूडच्या अनेक अफेअरची चर्चा तर खूप झाली, पण यापैकी अनेकांची नाती लग्नापर्यंत पोहोचू शकली नाहीत. बॉबी देओल (Bobby Deol) आणि नीलम कोठारी (Neelam Kothari) यांचं नातं याच यादीत येतं. 90 च्या दशकात बॉबी व नीलमच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. पण 5 वर्षांत दोघांचे ब्रेकअप झाले. या अधु-या प्रेमकहाणीतील विलन होते, स्वत: बॉबीचे डॅडी धर्मेन्द्र (Dharmendra). पण त्यावेळी बदनाम झाली ती पूजा भट्ट. 

होय, बॉबी व नीलम प्रेमात असताना आणि दोघंही लग्न करणार असल्याचं मानलं जात असताना अचानक दोघांच्या ब्रेकअपची बातमी आली आणि पाठोपाठ या ब्रेकअपसाठी पूजा भट्टला (Pooja Bhatt) दोषी ठरवलं गेलं. बॉबी व पूजा भट्टची जवळीक वाढल्यामुळे नीलमने बॉबीशी ब्रेकअप केला, अशा चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. अर्थात पुढे अनेक वर्षांनी एका मुलाखतीत खुद्द नीलमने या चर्चा खोट्या ठरवल्या होत्या.

 ‘स्टारडस्ट’ या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत नीलम यावर बोलली होती. बॉबी व माझं ब्रेकअप कोणत्याही तिसऱ्या व्यक्तिमुळे झालं नव्हतं. तो आम्ही दोघांनी मिळून घेतलेला निर्णय होता, असं नीलमने स्पष्ट केलं होतं.

धर्मेन्द्र यांच्यामुळे अधुरी राहिली ही प्रेमकहाणी
 
बॉबी व नीलम एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.  दोघे लग्नही करणार होते. मात्र पापा धर्मेन्द्र यांना बॉबीचं हे लग्न मान्य नव्हतं. असं म्हणतात की, सिनेमात काम करणारी मुलगी त्यांना सून म्हणून नको होती. म्हणून त्यांनी हे लग्न होऊ दिलं नाही.   बॉबीने अरेंज मॅरेज करावं, अशी त्यांची इच्छा होती. पित्याच्या इच्छेखातर  बॉबी नीलमपासून वेगळा झाला होता.

Web Title: Bobby Deol Birthday Special: bobby deol and neelam kothari love story end because of dharmendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.