'हमराज' या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल येणार? अमिषा पटेल काय म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 03:16 PM2024-02-12T15:16:19+5:302024-02-12T15:18:37+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपट निर्मात्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल बनवण्याचा ट्रेंड सुरू केला आहे.

Bobby Deol, Akshaye Khanna and Ameesha Patel starrer Humraaz to get a sequel | 'हमराज' या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल येणार? अमिषा पटेल काय म्हणाली...

'हमराज' या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल येणार? अमिषा पटेल काय म्हणाली...

सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपट निर्मात्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल बनवण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. यापूर्वी अनेक सिक्वेल रिलीज झाले आहेत आणि ते हिटही झाले आहेत. तसेच बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. यात गोलमाल, सिंघन, धूम, गदर अशा सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. सुपरहिट जोडी अब्बास-मस्तान त्यांच्या 2002 मधील हिट चित्रपट 'हमराझ' चा सिक्वेल बनवण्याचा विचार करत असल्याचं बोलले जात आहे. 

'हमराझ' 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉबी देओल, अक्षय खन्ना आणि अमिषा पटेल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.  या चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी अनेक दिवसांपासून चाहते करत आहेत. नुकतेच मीडियाशी बोलताना साधताना अमिषा पटेलनं 'हमराझ'चा सिक्वेल बनवण्यात येत असल्याचे संकेत दिले आहेत. 

अमिषा पटेल म्हणाली, जर  'हमराझ'चा सिक्वेल येत असेल तर तो बॉबी देओल आणि माझ्याशिवाय बनू शकत नाही. त्यात आमचा सहभाग असेलच. सिक्वेलबद्दल मी पण ऐकतच आहे आणि चाहत्यांना त्याची उत्सुकता आहे. अब्बास-मस्तान हे चित्रपटाच्या विषयावर काम करत आहेत. मला वाटतं की आपण सर्वांनी अधिकृत घोषणेची वाट पाहिली पाहिजे. चाहते गदर ३, कहो ना प्यार है या सिनेमांच्या सिक्वेलचीही मागणी करत आहेत'.

रिपोर्टनुसार, 'हमराझ' चित्रपटाच्या सिक्वेलसाठी दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी जवळपास 100 कल्पनांवर चर्चा केली आहे. अखेरीस त्यांनी एक थ्रिलर कथा निवडल्याचं म्हटलं जात आहे. जी मूळ चित्रपटापेक्षा चांगली आहे. तर 'हमराझ' या चित्रपटाची कथा प्रेम त्रिकोणावर आधारित होती, ज्यामध्ये अक्षय खन्ना खलनायकाच्या भूमिकेत होता. एवढेच नाही तर या चित्रपटातील गाणी हीट ठरली होती. दमदार कथा आणि दमदार अभिनयामुळे 'हमराझ' हा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
 

Web Title: Bobby Deol, Akshaye Khanna and Ameesha Patel starrer Humraaz to get a sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.