Birthday Special : चित्रपटांमध्ये काम न करताही सुनील शेट्टी कमावितो १०० कोटी रुपये !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 14:00 IST2017-08-11T08:12:23+5:302017-08-11T14:00:03+5:30
भारतीय चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा उमटविणारा अभिनेता सुनील शेट्टी आज त्याचा ५६वा वाढदिवस साजरा करीत आहे. सुनील शेट्टीने त्याच्या करिअरची ...

Birthday Special : चित्रपटांमध्ये काम न करताही सुनील शेट्टी कमावितो १०० कोटी रुपये !!
भ रतीय चित्रपटसृष्टीत स्वत:चा ठसा उमटविणारा अभिनेता सुनील शेट्टी आज त्याचा ५६वा वाढदिवस साजरा करीत आहे. सुनील शेट्टीने त्याच्या करिअरची सुरुवात १९९२ मध्ये ‘बलवान’ या चित्रपटातून केली होती. पुढे तो इंडस्ट्रीमध्ये एक जबरदस्त अॅक्शन अभिनेता म्हणून समोर आला. त्याकाळात सुनील शेट्टीने अक्षयकुमार, अजय देवगण सारख्या सुपरस्टार्सना चांगली टक्कर दिली होती. आजही सुनील शेट्टी इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह असून, त्याचा दबदबा कायम आहे.
![]()
सुनील शेट्टीचे पूर्ण नाव सुनील वीरप्पा शेट्टी असे आहे. सुनीलच्या डेब्यू चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा केला नव्हता. त्याला खºया अर्थाने १९९४ मध्ये आलेल्या ‘दिलवाले’ या चित्रपटाने ओळख मिळवून दिली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. सुनीलने त्याच्या करिअरमध्ये ११० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून, अजूनही तो इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह आहे. सुनीलने इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदरच १९९१ मध्ये माना शेट्टीबरोबर विवाह केला. सुनील आणि मानामध्ये जवळपास आठ वर्षे अफेअर होते. त्यानंतर त्यांनी विवाह केला.
![]()
‘धडकन’ या चित्रपटाने सुनीलला असे काही ग्लॅमर मिळवून दिले की, तो इंडस्ट्रीमध्ये सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यावेळी तो एका चित्रपटासाठी तब्बल आठ कोटी रुपये मानधन घेत होता. सुनीलने चित्रपटांबरोबर हॉटेल इंडस्ट्रीमध्येही लौकीक मिळविला. सध्या तो त्याचा सर्वाधिक वेळ बिझनेसकडेच देत असल्याने मोजक्याच चित्रपटांमध्ये तो झळकत आहे.
![]()
सुनीलची पत्नी माना शेट्टी हिचीदेखील इंटिरिअर डिझायनिंग आणि आर्किटेक्चर कंपनी आहे. मानाची एक एनजीओदेखील आहे. तसेच तिचा एक होम डिकोर स्टोर आहे. त्याचबरोबर माना सुनीलच्या बिझनेसमध्ये मॅनेजर म्हणून काम करते. सुनील शेट्टीचा ‘हॉटेल रॉयल इन’ नावाने रेस्टॉरंट चेन आहे. हॉटेल व्यतिरिक्त त्याचे एक प्रॉडक्शन हाउस आणि बुटीक आहे. या बिझनेसमधून सुनील दरवर्षाच्या १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करतो. सुनील शेट्टीची लाइफस्टाइल एखाद्या राजासारखी आहे. सध्या त्याची मुलगी आथिया बॉलिवूडमध्ये अॅक्टिव्ह असून, मुलगादेखील लवकरच डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे.