Birthday Special:  - अन् तो बोल्ड सीन संपताच रडू लागल्या रेखा;  वाचा एक ‘अनटोल्ड’ किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 08:00 IST2019-10-10T08:00:00+5:302019-10-10T08:00:02+5:30

अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणा-या रेखा यांचा आज वाढदिवस...

birthday special some unknown facts about actress rekha | Birthday Special:  - अन् तो बोल्ड सीन संपताच रडू लागल्या रेखा;  वाचा एक ‘अनटोल्ड’ किस्सा

Birthday Special:  - अन् तो बोल्ड सीन संपताच रडू लागल्या रेखा;  वाचा एक ‘अनटोल्ड’ किस्सा

ठळक मुद्देपत्रकार यासीर उस्मान यांनी लिहिलेल्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे.

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांचा आज (१० ऑक्टोबर ) वाढदिवस. वयाच्या १४ व्या वर्षी फिल्मी करिअरची सुरुवात करणा-या या सदाबहार अभिनेत्रीचे आयुष्य कायम चर्चेत राहिले.

 नववीत शिकत असताना पैसे कमावण्यासाठी म्हणून रेखाला शाळा सोडावी लागली आणि तिने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तिचे वय होते 14 वर्षे.

हिंदीचे एक अक्षरही न येणारी रेखा पैशांसाठी मुंबईसारख्या मोठ्या शहरात दाखल झाली आणि पुढे नावारूपास आली. पण त्याआधी तिला ब-याच खस्ता खाव्या लागल्या. सुरुवातीच्या काळात काही बी ग्रेड चित्रपट करण्याची वेळही तिच्यावर आली.

वयाच्या 15 व्या वर्षी ‘अंजाना सफर’ या चित्रपटाच्या सेटवर तिच्यासोबत असे काही घडले की, ती अक्षरश: ढसाढसा रडली. ‘अंजाना सफर’च्या सेटवर असे काय झाले होते, तेच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

पत्रकार यासीर उस्मान यांनी लिहिलेल्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात या घटनेचा उल्लेख आहे. त्यानुसार, रेखा महबूब स्टुडिओमध्ये ‘अंजाना सफर’ची शूटींग करत होती. चित्रपटाचा हिरो होता विश्वजीत चॅटर्जी आणि दिग्दर्शक होते राजा नवाथे. चित्रपटाच्या एका सीनमध्ये हिरो-हिरोईनवर एक बोल्ड सीन्स शूट होणार होता. आश्चर्य म्हणजे, रेखाला या बोल्ड सीनची जराही कल्पना नव्हती. दिग्दर्शकाने ‘अ‍ॅक्शन’ म्हणताच, हिरोने रेखाला आपल्या मिठीत घेतले आणि अचानक तिच्यावर चुंबनाचा वर्षाव सुरु केला.  हिरो सलग पाच मिनिटे रेखावर चुंबनावा वर्षाव करत राहिला. पाच मिनिटानंतर दिग्दर्शकाने ‘कट्’ म्हटले आणि सीन संपला. या संपूर्ण सीनदरम्यान रेखाने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले होते.  लाज आणि शरमेने जणू ती जागच्या जागी थिजली होती. सीन संपला आणि रेखाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. 
पुढे याच रेखाने अनेक चित्रपटांत बोल्ड सीन्स दिलेत. पण तो किस्सा रेखा कधीच विसरू शकली नाही.

 

Web Title: birthday special some unknown facts about actress rekha

टॅग्स :Rekhaरेखा