17 व्या वर्षी लग्न, घटस्फोट अन् लिव्ह-इन... असे आहे या अभिनेत्रीचे आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 12:46 IST2019-12-19T12:45:20+5:302019-12-19T12:46:09+5:30

ही अभिनेत्री तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ख-या आयुष्यातही ती तितकीच बिनधास्त आहे.

Birthday special mahie gill know about her life facts | 17 व्या वर्षी लग्न, घटस्फोट अन् लिव्ह-इन... असे आहे या अभिनेत्रीचे आयुष्य

17 व्या वर्षी लग्न, घटस्फोट अन् लिव्ह-इन... असे आहे या अभिनेत्रीचे आयुष्य

ठळक मुद्देमाहीचे खरे नाव रिम्पी कौर गिल आहे.

2003 साली ‘हवायें’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करणा-या माही गिल हिला अनुराग कश्यपच्या ‘देव डी’ या सिनेमाने वेगळी ओळख दिली. आज माहीचा वाढदिवस.
19 डिसेंबर 1975 रोजी जन्मलेली माही तिच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ख-या आयुष्यातही ती तितकीच बिनधास्त आहे. याचवर्षी जूनमध्ये माहीने एक खुलासा करत, सर्वांना धक्का दिला होता.

होय, मी दीर्घकाळापासून लिव्ह इनमध्ये असून माझी एक मुलगी आहे, असे माहीने सांगितले होते. तोपर्यंत माहीचा कुणी बॉयफ्रेन्ड आहे, हे कुणाच्याही गावी नव्हते. मला अडीच वर्षांची मुलगी आहे, हा तिचा खुलासाही चाहत्यांसाठी धक्कादायक होता. ही मुलगी तिने  दत्तक घेतलीय की तिला जन्म दिला हे मात्र अद्यापही स्पष्ट नाही. माहीच्या मुलीचे  नाव वेरोनिका आहे. ‘मी अद्याप लग्न केलेले नाही. लग्नाआधीही मुलं जन्मास घातली जाऊ शकतात. मला यात काहीही अडचण नाही. लग्न एक सुंदर भावना आहे. पण ते करायचे की नाही, हा तुमचा खासगी निर्णय आहे,’ असे ती म्हणाली होती.

माहीने बॉयफे्रन्डसोबत लग्न केलेच तर ते तिचे दुसरे लग्न असेल. कारण वयाच्या 17 व्या वर्षी माहीने लग्न केले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही.

माहीचे खरे नाव रिम्पी कौर गिल आहे. चंदीगडच्या माहीने बॉलिवूडमध्ये येण्याआधी पंजाबी चित्रपटात काम केले आहे.

 
 

Web Title: Birthday special mahie gill know about her life facts