महेश भट यांनी सर्वांसमोर घेतला होता लेकीचा क्लास, ढसाढसा रडली होती आलिया भट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 10:15 IST2020-03-15T10:14:51+5:302020-03-15T10:15:51+5:30

एका मुलाखतीत खुद्द आलियाने हा खुलासा केला होता.

birthday special mahesh bhatt makes alia bhatt cry before the audition of her first movie-ram |  महेश भट यांनी सर्वांसमोर घेतला होता लेकीचा क्लास, ढसाढसा रडली होती आलिया भट

 महेश भट यांनी सर्वांसमोर घेतला होता लेकीचा क्लास, ढसाढसा रडली होती आलिया भट

ठळक मुद्दे०१२ मध्ये  स्टुडंट ऑफ द इअर याच या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून आलियाने डेब्यू केला.

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक महेश भट यांची लाडकी लेक आलिया भट हिचा आज वाढदिवस. आज आलिया 27 वा वाढदिवस साजरा करतेय. आज आलिया टॉप मोस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण बॉलिवूडच्या तिच्या पहिल्या ऑडिशनचा किस्सा तुम्हाला ठाऊक आहे का? होय, वडिल महेश भट यांनी सर्वांसमोर आलियाला रडवले होते. एका मुलाखतीत खुद्द आलियाने हा खुलासा केला होता.

काय म्हणाली होती आलिया?
‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी आलियाने ऑडिशनदिले होते. याच ऑडिशनआधीचा हा किस्सा. आलियाने सांगितले होते की,  ‘मी  स्टुडंट ऑफ द इयरच्या ऑडिशनसाठी जात होते. नेमक्या त्यावेळी डॅडनी मला सर्वांसमोर रडवले होते. अनेक गोष्टी माझ्या मनात होत्या. ज्या मी डॅडला कधीच सांगितल्या नव्हत्या. पण ऑडिशनला जात असताना का कुणास ठाऊक मी डॅडला मॅसेज केला. मला खूप नर्व्हस फिल होतेय, असे मी मॅसेजमध्ये लिहिले. तो मॅसेज डॅडनी वाचला आणि जाण्याआधी मला माझ्या ऑफिसमध्ये येऊन भेट, असे त्यांनी मला सांगितले. डॅड मला समजावतील, काही टिप्स देतील, अशी माझी अपेक्षा होती. मी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले.

  तिथे  त्यांच्यासोबत इमरान हाश्मी, माझी बहीण पूजा भट, काका मुकेश भट आणि आणखी काही लोक बसलेले होते. त्यांना पाहून मी आणखीच नर्व्हस झाले. डॅडसमोर जाऊन उभे झाल्यावर ते सर्वांसमोर बोलू लागले. आज आलिया खूप नर्व्हस फिल करतेय, असे सर्वांसमोर जाहीर करत ते म्हणाले,  या सर्वांसमोर उभी राहा आणि आता मला सांग तुला नक्की काय वाटतेय. डॅडचे ते वागणे माझ्यासाठी अनपेक्षित होते. मला त्यांचा प्रचंड राग आला. सर्वांसमोर जणू ते माझी परेड घेत आहेत, असे मला वाटले. शेवटी  मी त्यांना सांगायला सुरुवात केली आणि सांगता सांगता मी सर्वांसमोर ढसाढसा रडले. त्यावेळी माझ्या डोक्यात एकच विचार होता तो म्हणजे  अभिनयाचे माझे स्वप्न मी पूर्ण करू शकेल की नाही? ’

पुढे २०१२ मध्ये  स्टुडंट ऑफ द इअर याच या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून आलियाने डेब्यू केला.
या चित्रपटासाठी आलियासह ५०० मुलींनी ऑडिशन दिले होते. यातून आलियाची निवड झाली होती. पण ३ महिन्यांत १६ किलो वजन कमी कर, या अटीवर करणने तिला ही भूमिका देऊ केली होती. 

Web Title: birthday special mahesh bhatt makes alia bhatt cry before the audition of her first movie-ram