birthday special : या अभिनेत्याची पहिली पत्नी नग्न होऊन धावली होती बीचवर तर दुसरी पत्नी आहे त्याच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 17:45 IST2021-01-16T17:42:45+5:302021-01-16T17:45:47+5:30
हा अभिनेता नेहमीच त्यांच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. या अभिनेत्याने चार लग्नं केली आहेत.

birthday special : या अभिनेत्याची पहिली पत्नी नग्न होऊन धावली होती बीचवर तर दुसरी पत्नी आहे त्याच्यापेक्षा तीस वर्षांनी लहान
अभिनेता कबीर बेदी यांचा आज म्हणजेच १६ जानेवारीला वाढदिवस आहे. आज त्यांचा ७५ वा वाढदिवस ते साजरा करत आहेत. कबीर बेदी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. 'खून भरी मांग' या सिनेमामधील खलनायक किंवा 'मैं हूँ ना' मधील जनरल बक्षी म्हणून आपण कबीर बेदी यांना ओळखतो. त्यांनी अभिनेते, प्रेझेंटर आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कबीर बेदी नेहमीच त्यांच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. कबीर बेदी यांनी चार लग्नं केली आहेत.
चार पत्नींपैकी त्यांची पहिली पत्नी म्हणजे प्रोतिमा बेदी. प्रोतिमा आणि कबीर लग्नाआधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्याचदरम्यान लग्नाआधीच प्रोतिमा प्रेग्नेन्ट राहिल्या होत्या. अशा वादग्रस्त प्रोतिमा यांचं व्यावसायिक जीवनही तितकंच वादळी होतं. मॉडेल असणाऱ्या प्रोतिमा यांनी एका मासिकासाठी बीचवर चक्क नग्न फोटोशूट केलं होतं. त्यावेळी त्यांची लेक पूजा बेदी चार वर्षांची होती. 'सिनेब्लिट्झ' या मासिकासाठी प्रोतिमा नग्न होऊन बीचवर धावल्या होत्या. १९७४ साली हे मासिक लाँच होणार होते. मासिकाला हिट करण्यासाठी सिनेब्लिट्झची टीम विवस्र होऊन बीचवर धावणाऱ्या मॉडेलच्या शोधात होती. मात्र त्यासाठी त्या काळात कोणतीही मॉडेल हे करण्यास धजावणार नव्हती. 'सिनेब्लिट्झ' मासिकाच्या संपादिका रुसी यांनी प्रोतिमा यांचे नाव पुढे केले. प्रोतिमा यांना याबद्दल विचारले असता त्यांनीही ते मान्य केले होते.
परवीन दुसांज ३० वर्षांची तर कबीर बेदी ७२ वर्षांचे असताना त्यांनी चौथे लग्न केले. परवीन आणि कबीर फार जवळचे मित्र होते. दोघांनी एकमेकांना सुमारे १० वर्ष डेट केलं. त्यानंतर कबीर यांच्या ७० व्या वाढदिवसाला त्यांनी परवीनशी लग्न केले. कबीर यांच्यासोबत लग्नासाठी परवीनच्या घरच्यांकडून विरोध होता. मात्र नंतर त्यांनी परवानगी दिली. लग्नात दोघांचीही कुटुंबं उपस्थित होते. मात्र कबीर यांचं हे अजब गजब लग्न त्यांची मुलगी पूजा बेदीला मान्य नव्हतं. त्यामुळे ती या लग्नात गेली नव्हती.