पाहा, जान्हवी कपूरच्या ‘लव्ह लाईफ’मधील ‘मिस्ट्री मॅन’; यांच्यासोबत जोडले गेले नाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 11:14 IST2020-03-06T11:14:21+5:302020-03-06T11:14:21+5:30

जान्हवी कपूर हिचा आज वाढदिवस.

birthday special janhvi kapoor is rumoured to date some friends from outside the bollywood-ram | पाहा, जान्हवी कपूरच्या ‘लव्ह लाईफ’मधील ‘मिस्ट्री मॅन’; यांच्यासोबत जोडले गेले नाव 

पाहा, जान्हवी कपूरच्या ‘लव्ह लाईफ’मधील ‘मिस्ट्री मॅन’; यांच्यासोबत जोडले गेले नाव 

ठळक मुद्देशिखरशिवाय अभिनेता इशान खट्टरसोबतही जान्हवीचे नाव जोडले गेले आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर हिचा आज वाढदिवस. आज जान्हवी तिचा 23 वा वाढदिवस साजरा करतेय. ‘धडक’ मधून जान्हवीने शानदार डेब्यू केला आणि जान्हवी स्टार झाली. आताश: तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली आहे. आज आम्ही जान्हवीच्या लव्ह लाईफबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. होय, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जान्हवीच्या लव्ह लाईफच्या चर्चा होत्या.

2018 मध्ये जान्हवीचा पहिला सिनेमा ‘धडक’ रिलीज झाला. या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी तिच्या व अक्षत रंजन यांच्या अफेअरच्या बातम्या जोरात होत्या. अक्षत हा जान्हवीचा बालपणीचा मित्र आहे. जान्हवीच्या 21 व्या बर्थ डेला अक्षतने आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर स्वत:चा आणि जान्हवीचा फोटो शेअर केला होता. या फोटोवर कमेंट करताना जान्हवीने आय लव्ह यू लिहिले होते. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांचे पेव फुटले होते. अक्षत हा Tufts युनिव्हर्सिटीतून फिल्म अ‍ॅण्ड मीडिया स्टडिज व इंटरनॅशनल रिलेशन्सचे शिक्षण घेतले आहे.

जान्हवी व अक्षत अलीकडे क्वचित एकत्र दिसतात. एकत्र दिसले की लगेच त्यांच्या डेटींगच्या चर्चा सुरु होतात. एका मुलाखतीत जान्हवीने अक्षतसोबतचे रिलेशनशिप निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते. ‘तुला एखादा मुलगा आवडत असेल तर आमच्याशी भेट घालून घे आणि लग्न करत, असे माझ्या घरच्यांनी मला स्पष्टपणे बजावले आहे. पण मला आवडणाºया प्रत्येक मुलाशी मी लग्न करू शकत नाही,’ असे जान्हवी म्हणाली होती.

अक्षतप्रमाणे जान्हवी आणि शिखर पहारिया यांच्या डेटींच्या अफवाही मध्यंतरी जोरात होता. शिखर हा माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. अर्थात जान्हवीने कधीही हे रिलेशनशिप मान्य केले नाही.

शिखरशिवाय अभिनेता इशान खट्टरसोबतही जान्हवीचे नाव जोडले गेले आहे. जान्हवी व इशान दोघांनी ‘धडक’ या सिनेमात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र कालांतराने आपआपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे असल्याने दोघांनीही ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: birthday special janhvi kapoor is rumoured to date some friends from outside the bollywood-ram