Birthday Special : ‘या’ देशाच्या प्रिन्ससोबत होते जॅकलिन फर्नांडिसचे अफेअर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2017 11:25 IST2017-08-11T05:39:04+5:302017-08-11T11:25:53+5:30
श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिचा आज (११ आॅगस्ट) वाढदिवस. मॉडल म्हणून करिअरला सुरुवात करणा-या जॅकने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स ...

Birthday Special : ‘या’ देशाच्या प्रिन्ससोबत होते जॅकलिन फर्नांडिसचे अफेअर !
श रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस हिचा आज (११ आॅगस्ट) वाढदिवस. मॉडल म्हणून करिअरला सुरुवात करणा-या जॅकने २००६ मध्ये मिस युनिव्हर्स श्रीलंकाचा किताब जिंकला आणि पुढे ती बॉलिवूडमध्ये आली. २००९ मध्ये जॅक एका मॉडेलिंग शोसाठी भारतात आली आणि इथलीच होऊन गेली. होय, अमिताभ बच्चन आणि रितेश देशमुख यांच्या ‘अलादिन’ या चित्रपटासाठी तिने आॅडिशन दिली आणि हा चित्रपट तिला मिळाला. जाणून घेऊ या जॅकलिनबद्दल आणखी काही...
![]()
११ आॅगस्ट १९८५ रोजी जन्मलेली जॅकलिन श्रीलंकेची नागरिक असली तरी तिचे कनेक्शन अनेक देशांशी राहिले आहे. याचाच परिणाम म्हणजे, इंग्लिश, स्पॅनिश, फ्रेंच, अरबी आणि हिंदी या भाषा तिला अवगत आहेत. हॉलिवूड अभिनेत्री बनण्याचे जॅकचे स्वप्न होते. पण कदाचित जॅकच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. हॉलिवूडऐवजी ती बॉलिवूडची अभिनेत्री झाली.
![]()
मास कम्युनिकेशनची विद्यार्थीनी राहिलेल्या जॅकने वयाच्या १४ व्या वर्षी टीव्हीवर आपला पहिला शो होस्ट केला होता.
जॅकलिनच्या वाट्याला अनेक चित्रपटांचे सीक्वल आलेत. रेस२, मर्डर२, हाऊसफुल२ आणि आता जुडवा२ असे अनेक चित्रपट तिने केलेत. आत्तापर्यंत तिच्या वाट्याला फार दमदार भूमिका आलेली नाही. पण प्रॉपर्टी जमवण्याच्या बाबतीत जॅकचा वेग प्रचंड आहेत. श्रीलंकेत तिच्या स्वत:च्या मालकीचे एक बेट आहे. श्रीलंकेचा सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कुमार संगकारा याच्या मालकीच्या बेटाशेजारी तिचे बेट आहे.
![]()
कमीच लोकांना ठाऊक आहे की, जॅकलिन दीर्घकाळ बहरिनचा प्रिंन्स शेख हसन राशीद अल खलीफा याला डेट करत होती. दोघांनी लग्न केल्याचीही चर्चा होती. मात्र बॉलिवूडच्या एका डायरेक्टरमुळे या दोघांचे ब्रेकअप झाले. हा डायरेक्टर म्हणजे साजिद खान. होय, ‘हाऊसफुल२’दरम्यान साजिद व जॅकलिन जवळ आलेत. त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली. प्रिन्सच्या कानावर हे गेले आणि त्याने जॅकला याबद्दल जाब विचारला. येथेच त्यांच्या नात्याचा अंत झाला.
अर्थात साजिदसोबतचे जॅकचे नातेही फार काळ टिकू शकले नाही. ‘रेस2’ आणि सलमानसोबतचा ‘किक’ हे जॅकचे दोन सिनेमे हिट झालेत आणि यानंतर साजिद व जॅकलिन यांच्यातील दुरावा वाढू लागला. जॅकबद्दल साजिद अति पजेसिव असल्याचे म्हटले जाते. जॅकला त्याचा हा स्वभाव खटकू लागला आणि तिने या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
![]()
जॅकलिन सोशल मीडियाची क्वीन आहे. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे १ कोटी ३० लाख फॉलोअर्स आहेत. जॅकलिनने कधीच त्यांना निराश केले आहे. अलीकडे जॅकलिनने स्वत:चे टॉपलेस फोटोशूट केले होते. यासाठी ती बरीच ट्रोलही झाली होती. मात्र जॅकने याची पर्वा केली नाही. त्यामुळेच एक बोल्ड अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.
![]()
जॅकलिनची स्माईल अतिशय गोड आहे. ती सतत हसत असते. सलमान खान पहिल्यांदा तिला भेटला तेव्हा, तिचा हसरा चेहरा पाहून तुझे नाव मुस्कान असायला हवे, असे म्हणाला होता.