Birthday special: श्रद्धा कपूरचे बालपणाचे हे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 06:00 IST2019-03-03T06:00:00+5:302019-03-03T06:00:00+5:30

वडिल शक्ती कपूर पंजाबी आणि आई शिवांगी मराठी असल्यामुळे श्रद्धावर बालपणापासून दोन्ही संस्कार झाले आहेत. चिमुकल्या श्रद्धाच्या बालपणीच्या फोटोतील अदा या जणू अभिनेत्रीप्रमाणेच असल्याचे दिसते. 

Birthday special: Have you seen this photograph of Shraddha Kapoor's childhood? | Birthday special: श्रद्धा कपूरचे बालपणाचे हे फोटो तुम्ही पाहिले का?

Birthday special: श्रद्धा कपूरचे बालपणाचे हे फोटो तुम्ही पाहिले का?

श्रद्धा कपूरचे लहानपणीच्या फोटोंना सोशल मीडियावर अधिक पसंती मिळते. तिचे  बोलके डोळे, स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच की काय बालपणापासूनच ती चित्रपटसृष्टीशी जोडली गेलेली आहे. श्रद्धा कपूर म्हणजेच शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांची ही लेक.

शक्ती कपूर यांच्यासह चिमुकल्या श्रद्धाचा लूक तुम्हाला तिच्या प्रेमात पाडेल. वडिल शक्ती कपूर पंजाबी आणि आई शिवांगी मराठी असल्यामुळे श्रद्धावर बालपणापासून दोन्ही संस्कार झाले आहेत. चिमुकल्या श्रद्धाच्या बालपणीच्या फोटोतील अदा या जणू अभिनेत्रीप्रमाणेच असल्याचे दिसते. 


लहानपणी ती कायमच आपल्या वडिलांसोबत म्हणजेच शक्ती कपूर यांच्याबरोबर सेटवर जात असे. त्यांना पाहून त्यांचे डायलॉग बोलण्याचा प्रयत्न करत असे. शिवाय आरशासमोर उभी राहून ती डान्स करत असे. त्यामुळेच की काय आज एक अभिनेत्री, गायिका, गीतकार आणि डिझायनर म्हणून श्रद्धा कपूर हिने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

'आशिकी 2','एक व्हिलन', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन 2' 'स्त्री' अशा तिच्या विविध सिनेमातील भूमिका रसिकांना भावल्या आहेत. आजच्या पीढीची नायिका म्हणून श्रद्धाने तरुणाईच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यामुळेच तिचा हा बालपणीचा फोटो तुम्हाला नक्कीच आवडेल.  

Web Title: Birthday special: Have you seen this photograph of Shraddha Kapoor's childhood?