Birthday Special : छोटा नवाब तैमूर अली खान झाला २ वर्षांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 10:13 IST2018-12-20T10:11:40+5:302018-12-20T10:13:28+5:30

अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर दोन वर्षांचा झाला असून साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात आपला वाढदिवस साजरा करतो आहे.

Birthday Special: Chhota Nawab Taimur Ali Khan was 2 years old | Birthday Special : छोटा नवाब तैमूर अली खान झाला २ वर्षांचा

Birthday Special : छोटा नवाब तैमूर अली खान झाला २ वर्षांचा

ठळक मुद्देतैमूर सैफ अली खान व करीना कपूर पेक्षाही लोकप्रियतैमूर झाला दोन वर्षांचा

अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर दोन वर्षांचा झाला असून साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात आपला वाढदिवस साजरा करतो आहे. तैमुरचा जन्म २० डिसेंबर २०१६ ला झाला. तैमुर आज दोन वर्षाचा जरी झाला असला तरी त्याची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात.

सध्या तैमूर आपल्या आई-वडीलांसोबत साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात वाढदिवस साजरा करायला गेला आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो ही प्रचंड व्हायरल होत आहेत.

तैमूरचा वाढदिवस दोन आठवड्या आधीच साजरा करण्यात आला. त्याची आई करिना कपूरने याचे आयोजन मुंबईत केले होते.


तैमूरच्या प्री-बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये बच्चे कंपनी सहभागी झाली होती. या पार्टीत इनाया नाओमी खेमू, आई सोहा अली खानसह हजर होती. रणवीजय सिंगची मुलगी काइनाथ सिंग, तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य कपूर आणि इतर स्टार किड्स हजर होते. यावेळी त्याची मावशी करिश्मा कपूर, तिचा मुलगा किआन आणि तिची आई बबिता कपूर खास उपस्थित होत्या.

 


करिना व सैफने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवले, त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. या नावावरून सैफिनाला प्रचंड ट्रोल केले गेले होते. पण जसा जसा तैमूर मोठा झाला, तशी तशी त्याची लोकप्रीयता वाढत गेली. इतकी की, बॉलिवूडचे बडे स्टारही त्याचे ‘दिवाने’ आहे. इतकेच नाही तर तैमुरचा बाहुलादेखील बाजारात आला आहे. हा बाहुला केरळच्या एका स्टोर्समध्ये विकल्या जात असल्याचेसमोर आले आहे. आता इतर लहान मुलंसुद्धा तैमुरसोबत खेळू शकतात. 

 

Web Title: Birthday Special: Chhota Nawab Taimur Ali Khan was 2 years old