टीव्हीच्या ‘या’ अभिनेत्रीने दिला गोंडस बाळाला जन्म; सहकलाकारांनी दिल्या शुभेच्छा!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 18:48 IST2020-02-22T18:42:41+5:302020-02-22T18:48:21+5:30

‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्रीने हा आनंद सर्वांसोबत शेअर केला आहे. मालिकेत तिच्यासोबत केलेल्या कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Birth of a cute baby by the TV actress wishes from Colleagues !! | टीव्हीच्या ‘या’ अभिनेत्रीने दिला गोंडस बाळाला जन्म; सहकलाकारांनी दिल्या शुभेच्छा!!

टीव्हीच्या ‘या’ अभिनेत्रीने दिला गोंडस बाळाला जन्म; सहकलाकारांनी दिल्या शुभेच्छा!!

 प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री लोवी ससान हिने अलीकडेच गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्रीने हा आनंद सर्वांसोबत शेअर केला आहे. मालिकेत तिच्यासोबत केलेल्या कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 

लोवी ससान हिने मागील वर्षी फेब्रुवारी २०१९ मध्ये बिझनेसमॅन कौशिक कृष्णमूर्ती याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. तर १९ फेब्रुवारी २०२० रोजी तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्याचे नाव ‘रॉयस’ असे ठेवण्यात आले असून तिच्या टीव्ही वर्तुळातील कलाकारांनी तिच्या भरपूर साºया शुभेच्छा दिल्या आहेत.

लोवी ससान म्हणते,‘ रॉयस हे आमच्यासाठी देवाने दिलेले हे स्पेशल गिफ्ट आहे. आम्ही आमच्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. आम्ही डॉक्टरांचे आभारी आहोत, त्यांनी आमची डिलीव्हरी केली.’ तिला टीव्ही सेलेब्स देवोलिना भटाचार्यजी, पवित्र पुनिया आणि इतर कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे कपल यासोबतच त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवसही साजरा करणार आहेत. 

Web Title: Birth of a cute baby by the TV actress wishes from Colleagues !!