असा साजरा झाला बिपाशा बासूचा ‘मॅजिकल बर्थ डे’! पाहा, व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 15:56 IST2019-01-07T15:55:17+5:302019-01-07T15:56:12+5:30

बंगाली बाला बिपाशा बासू आज ७ जानेवारीला आपला ४० वा वाढदिवस साजरा करतेय. तूर्तास बिपाशाच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करताहेत. काल १२ च्या ठोक्याला बिप्सने पती करण सिंग ग्रोव्हर आणि आपल्या काही खास मित्रांसह वाढदिवस साजरा केला.

Bipasha Basu's Inside birthday bash | असा साजरा झाला बिपाशा बासूचा ‘मॅजिकल बर्थ डे’! पाहा, व्हिडिओ!!

असा साजरा झाला बिपाशा बासूचा ‘मॅजिकल बर्थ डे’! पाहा, व्हिडिओ!!

बंगाली बाला बिपाशा बासू आज ७ जानेवारीला आपला ४० वा वाढदिवस साजरा करतेय. तूर्तास बिपाशाच्या बर्थ डे सेलिब्रेशनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करताहेत. काल १२ च्या ठोक्याला बिप्सने पती करण सिंग ग्रोव्हर आणि आपल्या काही खास मित्रांसह वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनदरम्यान बिप्स पतीला किस करताना  दिसली.


  एक खास पोस्ट शेअर करून करणने बिप्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. ‘माझ्यासाठी आजचा दिवस वर्षाचा सगळ्यांत चांगला दिवस आहे. हॅपी बर्थ डे माय लव्ह...तू जगात माझ्यासाठी आलीस आणि तुझ्यामुळेच माझे आयुष्य इतके सुंदर झाले,’असे करणने लिहिले.

बिपाशानेही पतीसोबतचा एक फोटो शेअर करत, ‘मॅजिकल बर्थ डे’, असे लिहिले. बिपाशा दीर्घकाळापासून चित्रपटांत दिसलेली नाही. २०१५ मध्ये ‘अलोन’ या चित्रपटात बिपाशा अखेरची दिसली होती. या चित्रपटात बिप्स करण सिंग ग्रोव्हर याच्यासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसली होती. याच चित्रपटाच्या सेटवर बिपाशा व करण यांच्यात रोमान्स फुलला आणि २०१६मध्ये बिपाशाने करणसोबत लग्न केले.

अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे व होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. १९९६ पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. २००१ मध्ये  अजनबी  या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

२००२ मध्ये रिलीज झालेला  राज  हा बिपाशाच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा होता. या सिनेमासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीत तिला नामांकन मिळाले होते. त्यानंतर २००५ मध्ये आलेला  नो एन्ट्री  हा सिनेमासुद्धा हिट ठरला होता. बिपाशाने आत्तापर्यंत जवळजवळ ५५ सिनेमांमध्ये अभिनय केला.

Web Title: Bipasha Basu's Inside birthday bash