Bipasha Basu: 'माझं संपूर्ण जग एक फोटोत..', मुलगी देवी आणि पती करणसोबतचा बिपाशा बासूने शेअर केला क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 18:36 IST2023-05-03T18:33:56+5:302023-05-03T18:36:54+5:30

बिपाशाने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोमध्ये ती छोट्या देवीला कडेवर घेऊन तिला प्रेमाने किस करताना दिसत आहे.

Bipasha basu shared a lovely picture with daughter devi and husband karan singh grover see pics | Bipasha Basu: 'माझं संपूर्ण जग एक फोटोत..', मुलगी देवी आणि पती करणसोबतचा बिपाशा बासूने शेअर केला क्युट फोटो

Bipasha Basu: 'माझं संपूर्ण जग एक फोटोत..', मुलगी देवी आणि पती करणसोबतचा बिपाशा बासूने शेअर केला क्युट फोटो

बलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू लग्नानंतर ६ वर्षांनी आई झाली. काही महिन्यांपूर्वी गेल्या १२ नोव्हेंबरला तिने गोंडस मुलीला जन्म दिला. बिपाशा व करण सिंग ग्रोव्हर कन्येच्या आगमनाने सुखावले. देवी  त्यांनी आपल्या लेकीचं नाव देवी बासू सिंग ग्राेव्हर असं तिचं नामकरण झालं. अलिकडेच बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर त्यांच्या लग्नाचा सातवा वाढदिवस साजरा केला. 

अभिनेत्रीने आता मुलगी देवी आणि पती करणसोबत एक गोंडस फोटो इंस्टावर शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

बिपाशाने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोमध्ये ती छोट्या देवीला कडेवर घेऊन तिला प्रेमाने किस करताना दिसत आहे.  करण कॅमेऱ्याकडे बघतो आहे. फोटोत बिपाशाच्या नन्ही परीने ब्लू आणि व्हाईट स्ट्रईप असलेला फ्रॉक घातला आहे. त्याला मॅचिंग असा हेअरबँड लावला आहे आणि ती क्यूट दिसतेय. हा फोटो शेअर करत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "एका फोटो माझं संपूर्ण जग, माझे आयुष्य, माझे हृदय माझे जग, मुलीचे प्रेम, पती."

2016 मध्ये बिपाशा व करण यांनी लग्नगाठ बांधली होती. अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे. 1996 पासून तिने आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. 2001 मध्ये ‘अजनबी’ या सिनेमाद्वारे बिपाशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

‘अलोन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरते. 

Web Title: Bipasha basu shared a lovely picture with daughter devi and husband karan singh grover see pics