"...म्हणून मी करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केलं", लग्नाच्या ७ वर्षांनी बिपाशा बासूचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 10:37 IST2023-12-22T10:33:51+5:302023-12-22T10:37:49+5:30

अलोन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते.

Bipasha basu reveals why she married to karan singh grover video viral | "...म्हणून मी करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केलं", लग्नाच्या ७ वर्षांनी बिपाशा बासूचा मोठा खुलासा

"...म्हणून मी करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केलं", लग्नाच्या ७ वर्षांनी बिपाशा बासूचा मोठा खुलासा

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर सध्या जास्तीत जास्त वेळ लेक देवीसोबत घालवतायेत. अलिकडेच या कपलने आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला. देवीच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी दोघांनी मालदीवची निवड केली होती, सोशल मीडियावर त्यांनी बर्थ डे सेलिब्रेशनची झलक देखील दाखवली होती. अशातच बिपाशाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ पापाराझी बिपाशाला फायटरच्या टीझरबद्दल विचारताना दिसतोय. पापाराझीने बिपाशाला विचारलं तिला 'फायटर' सिनेमाचा टीझर कसा वाटला, यावर बिपाशा म्हणते त्यात सगळे हॉट दिसतायेत. करण तर हॉटच आहे नाही तर मी लग्न कशाला केलं असतं. असं बोलून बिपाशा स्वत:ला हसू येते. सोशल मीडियावर बिपाशाच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

अशी सुरु झाली होती बिपाशा-करणची लव्हस्टोरी
अलोन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते. त्याचेवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. २०१६मध्ये त्यांनी लग्न केलं लग्नाच्या ६ वर्षानंतर त्यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं. जिचं नाव त्यांनी देवी ठेवलं. अलिकेडच हे कपल एअरपोर्टवर देवीसोबत दिसलं होतं.  
 

Web Title: Bipasha basu reveals why she married to karan singh grover video viral