Video: सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन अन् रॅम्पवॉक! कॉन्फिडन्स असा की सगळे पाहतच राहिले, बिपाशा बासूचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:32 IST2026-04-05T14:32:13+5:302026-04-05T14:32:41+5:30

वाढलेल्या वजनामुळे बिपाशाला ट्रोल करण्यात येत आहे. पण बिपाशाच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. 

bipasha basu ramp walk video fans appreciate actress confidence video viral | Video: सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन अन् रॅम्पवॉक! कॉन्फिडन्स असा की सगळे पाहतच राहिले, बिपाशा बासूचं होतंय कौतुक

Video: सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन अन् रॅम्पवॉक! कॉन्फिडन्स असा की सगळे पाहतच राहिले, बिपाशा बासूचं होतंय कौतुक

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री बिपाशा बासूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बिपाशाने नुकतंच मुंबईतील एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली. फॅशन वीक फेस्टिव्हलमध्ये तिने रॅम्पवॉतही केला. पण, वाढलेल्या वजनामुळे बिपाशाला ट्रोल करण्यात येत आहे. पण बिपाशाच्या चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.  फॅशन फेस्टिव्हलमधील बिपाशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या फॅशन शोसाठी बिपाशाने खास लूक केला होता. बिपाशाने लाल रंगाच्या लेहेंग्यात नववधूसारखा लूक केला होता. भरजरी लेहेंग्यात ती नटली होती. बिपाशाने नवरीसारखे दागिनेही घातले होते. केसांचा बन बांधून त्यात कमळाची फुलं माळली होती. तिच्या रॅम्पवॉकने लक्ष वेधून घेतलं. मात्र वाढलेलं वजन आणि सुजलेला चेहरा पाहून काहींनी तिला ट्रोल केलं आहे. तर अभिनेत्रीचा आत्मविश्वास पाहून काही जण तिचं कौतुकही करत आहेत. 


बिपाशाच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. "काय आत्मविश्वास आहे...", "ड्रेस खूप जड असेल मानलं पाहिजे", "अतिसुंदर", "खूप सुंदर दिसतेय" अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. तर काहींनी तिला ट्रोलही केलं आहे. "काकूबाई दिसतेय", "नीट चालताही येत नाहीये" असंही अनेकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. 

Web Title : बिपाशा बसु का रैंप वॉक: बढ़े वजन के बावजूद आत्मविश्वास, ट्रोलर्स हुए शांत।

Web Summary : मुंबई के एक फैशन शो में बिपाशा बसु का रैंप वॉक वायरल हो गया। कुछ लोगों ने बढ़े हुए वजन के लिए उन्हें ट्रोल किया, तो कई लोगों ने लाल लहंगे में उनके आत्मविश्वास और दुल्हन के लुक की प्रशंसा की। प्रशंसकों ने उनकी सुंदरता और शालीनता की सराहना की।

Web Title : Bipasha Basu's ramp walk: Confidence shines despite weight gain, trolls silenced.

Web Summary : Bipasha Basu's ramp walk at a Mumbai fashion show went viral. While some trolled her for weight gain, many praised her confidence and bridal look in a red lehenga. Fans lauded her beauty and poise.