अतिवर्कआऊट करणे करण सिंह ग्रोवरला पडले महागात,आता कुबड्यांचा घ्यावा लागतोय आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 06:00 IST2018-12-26T06:00:00+5:302018-12-26T06:00:00+5:30

कुबड्यांच्या मदतीने चालतानाचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिममध्ये गरजेपेक्षा अधिक वर्कआऊट केल्याने तो जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला आता कुबड्यांची मदत घ्यावी लागतेय. 

Bipasha Basu Husband Karan Singh Grover Injured | अतिवर्कआऊट करणे करण सिंह ग्रोवरला पडले महागात,आता कुबड्यांचा घ्यावा लागतोय आधार

अतिवर्कआऊट करणे करण सिंह ग्रोवरला पडले महागात,आता कुबड्यांचा घ्यावा लागतोय आधार

हॉट आणि सेक्सी कपल अशी ओळख असणाऱ्या करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय असते. काही जण त्यांचं कौतुक करतात तर अनेकजण त्यांच्या लग्नावरून त्यांना ट्रोलही करतात. विशेषतः तिसरं लग्न केल्याने करणसिंहला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. आता पुन्हा एकदा करण सिंह ग्रोवर चर्चेत आला आहे. त्याला कारणीभूत ठरला आहे हा फोटो. होय, कारण करणला फिटनेसचेही वेड आहे. त्यामुळे तो सतत जिममध्ये घाम गाळत तासनतास वर्कआऊट करण्यात वेळ घालवत असतो. 

मात्र कधी कधी गरजेपेक्षा अतीवर्कआउट करणेही जीवाशी येऊ शकते. असेच काही घडले आहे करणबरोबर. अलीकडेच करणच्या पायाला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. कुबड्यांच्या मदतीने चालतानाचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिममध्ये गरजेपेक्षा अधिक वर्कआऊट केल्याने तो जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला आता कुबड्यांची मदत घ्यावी लागतेय. 


बॉडी पिळदार ठेवण्यासाठी, ऍब्ज कमावण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी कलाकार जिममध्ये घाम गाळत असतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तर प्रत्येक कलाकार फिटनेसवर लक्ष केंद्रीत करतो. असे बरेच कलाकार आहेत जे आपल्या बॉडीवर प्रचंड मेहनत घेत आहेत. इतरांप्रमाणे करणही फिटनेस फ्रिक आहे. फिटनेसचे वेड असलेल्या करणला  पिळदार बॉडी कमावणे ही काही सोपी गोष्ट नाही हे समजले असणार हे मात्र नक्की.

Web Title: Bipasha Basu Husband Karan Singh Grover Injured