गर्भवती असल्याच्या चर्चेवर बिपाशा बासूने केला खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 19:09 IST2017-12-21T13:39:49+5:302017-12-21T19:09:49+5:30
गेल्या काहीकाळापासून पडद्यावरून गायब असलेली अभिनेत्री बिपाशा बसू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही चर्चा तिच्या आगामी चित्रपटांशी संबंधित ...
.jpg)
गर्भवती असल्याच्या चर्चेवर बिपाशा बासूने केला खुलासा!!
ग ल्या काहीकाळापासून पडद्यावरून गायब असलेली अभिनेत्री बिपाशा बसू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही चर्चा तिच्या आगामी चित्रपटांशी संबंधित नसून, तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत आहे. होय, बिपाशा प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या सध्या सातत्याने समोर येत आहेत. परंतु ही बाब बिपाशाला फारशी पचनी पडली नसल्याने तिने याविषयी एक मोठे वक्तव्य केले आहे. वास्तविक काही दिवसांपूर्वी बिपाशा आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर मॅटरनिटी हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाली होती. त्यानंतर असा अंदाज लावला जात होता की, बिपाशा गर्भवती असावी. त्याचबरोबर बिपाशा ही गुड न्यूज चाहत्यांसाठी केव्हा शेअर करणार यावरूनही चर्चा रंगली होती.
अखेर बिपाशानेच एका मुलाखतीत गर्भवती असल्याच्या चर्चेवर खुलासा करीत, या चर्चा निराधार असल्याचे म्हटले आहे. तिने सांगितले की, सध्यातरी आमचे असा कुठलाच प्लान नाही. त्यामुळे मी गर्भवती असल्याच्या चर्चा निराधार आहेत. यावेळी बिपाशाने माध्यमांना विनंती करताना म्हटले की, कृपया अशाप्रकारच्या बातम्या देणे अन्य कुठलाही अंदाज लावणे बंद करावे. दरम्यान, बिपाशाने अभिनेता करण सिंग ग्रोवर याच्यासोबत एप्रिल २०१६ मध्ये लग्न केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल स्टार प्लसच्या ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’ या रिअॅलिटी शोच्या जज पॅनलमध्ये सहभागी होणार आहेत.
बिपाशाचा पती करण तेव्हा चर्चेत आला होता, जेव्हा ‘दिल मिल गए’ या मालिकेत त्याने डॉक्टर अरमान मलिकची भूमिका साकारली होती, तर बिपाशाने ‘डर सबको लगता हैं’ हा टीव्ही शो होस्ट करून छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. गेल्या काहीकाळापासून बिपाशा एकाही चित्रपटात झळकली नाही. परंतु पती करणसोबत ती नेहमीच व्हेकेशनवर जाताना स्पॉट होत असते. त्याचबरोबर सोशल मीडियावर या दोघांची चांगलीच चर्चा असते.