​कॅटरिनाचा मोठा खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 16:38 IST2016-09-11T11:08:14+5:302016-09-11T16:38:14+5:30

कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा अद्याप थांबलेली नाही. पण कॅटरिना मात्र या चर्चेपासून आणि रणबीरपासून बरीच लांब ...

Biggest disclosure of Katrina ... | ​कॅटरिनाचा मोठा खुलासा...

​कॅटरिनाचा मोठा खुलासा...

टरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा अद्याप थांबलेली नाही. पण कॅटरिना मात्र या चर्चेपासून आणि रणबीरपासून बरीच लांब निघून गेल्याचे दिसतेय. होय, कॅटरिनाच्या बोलण्यावरून तरी तसेच वाटतेय. रणबीरला विसरून कॅटने मुव्ह आॅन केले आहे. केवळ एवढेच नाही तर मुव्ह आॅन केल्यानंतर ती पुन्हा एकदा प्रेमात पडण्यासाठीही तयार आहे. एका मुलाखतीत खुद्द कॅटनेच हा खुलासा केला. ‘मी काय, कुणीही पुन्हा प्रेमात पडण्यापासून रोखायला नको. माझा प्रेमावर १०० टक्के विश्वास आहे. माझ्यासाठी प्रेम ही आयुष्यातील सगळ्यांत अनमोल गोष्ट आहे. प्रेम ही नितांत सुंदर भावना आहे,’ असे कॅट या मुलाखतीत म्हणाली. आता यावरून एक गोष्ट तर पक्की आहे की, कॅटरिना पुन्हा एकदा प्रेमात पडण्यास सज्ज आहे. मग काय, कॅट ज्याच्या प्रेमात पडेल ती नशीबवान व्यक्ती कोण, याचीच तेवढी प्रतीक्षा आहे. रणबीरपूर्वी कॅटचे नाव सलमान खानशी जोडले गेले होते. सध्या चर्चा आहे ती कॅट व आदित्य राय कपूरच्या डेटची. अर्थात आदित्य वा कॅटरिना यापैकी कुणीही यावर बोललेले नाही. पण कॅट व आदित्यमध्ये खिचडी शिजत असेल तर तेही लवकरच कळेल.

Web Title: Biggest disclosure of Katrina ...